आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना:छेडछाड केल्याची तक्रार घरच्यांना केल्यामुळे 9 वीत शिकणाऱ्या मुलीला जिवंत जाळले

बलिया9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बलियामध्ये शुक्रवारी एका तरुणाने छेडछाडचा विरोध करणाऱ्या 9वीतील विद्यार्थीनीला जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मुलगी 75% भाजली असून, तिला बीएचयूमध्ये भरती करण्यात आले आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी घराशेजारी राहणाऱ्या तरुणावार आरोप लावला आहे. एसपी देवेंद्र नाथ यांनी सांगितले की, पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. त्यांच्यावर आयपीसी कलम 307, 326, 354D आणि पॉक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबहडमध्ये शुक्रवारी रात्री मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून घरातील सर्वजण छतावर आले. यावेळी त्यांना पीडित आगीच्या विळख्यात आलेली दिसली. आग विझविताना मुलीच्या वडिलांचा हात भाजला. यानंतर पीडितेला जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले, तेथून तिला बीएचयूमध्ये रेफर केले. पीडितेच्या वडिलांचा आरोप आहे की, शेजारी राहणारा कृष्णा गुप्ता नेहमी मुलीची छेड काढत असे. याची तक्रार त्याच्या घरच्यांना केल्यामुळे त्याने मुलीली जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...