आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Madhya Pradesh Boy Tanmay Sahu Falls Into Borewell Rescue Operations Update | Madhya Pradesh Betul Mandvi News

400 फूट खोल बोअरवेलमध्ये दोन दिवसांपासून अडकला चिमुकला:तन्मयपासून NDRF अवघ्या 4 फूट अंतरावर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील बैतुलमध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षीय चिमुकल्याला 60 तासांनंतरही बाहेर काढण्यात आलेले नाही. हा बोअरवेल 400 फूट खोल आहे. मुलाला काढण्यासाठी बोअरला समांतर 44 फूट खोल खड्डा खोदण्यात आला आहे. 8 फुटांपर्यंत बोगदा करण्यात आला आहे. बोगदा अजून 4 फूट बांधायचा असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत त्यातील 8 फूट टनल बनवण्यात आली आहे. दगडामुळे बोगदा बनवण्यात अडचण येत आहे. बचावकार्य पूर्ण होण्यासाठी 4 तासांपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

तन्मयसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडवी येथील गायत्री मंदिरात गायत्री मंत्राचा जप केला.
तन्मयसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडवी येथील गायत्री मंदिरात गायत्री मंत्राचा जप केला.

बचाव कार्यावर देखरेख करणारे होमगार्ड कमांडंट एसआर आझमी यांनी सांगितले की, तन्मय बोअरवेलमध्ये 39 फूटांवर अडकला आहे. मुलांची साधारण तीन ते चार फूट उंची लक्षात घेऊन आम्ही 44 फुटांपर्यंत खड्डा खोदला आहे. NDRF आणि SDRF चे 61 जवान बोगदा बनवण्याचे काम करत आहेत. तन्मयचे वडील सुनील आणि आई रितू आपल्या मुलाच्या सुखरुपतेसाठी पार्थना करत आहेत.

मुलाला प्रथम सीएचसी अथनेर येथे नेणार : जिल्हाधिकारी
बोगदा बनवण्याचे काम क्रॉस बोअर मशिनने केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमनबीर सिंह बैंस यांनी सांगितले. बोअरमध्ये मोठ्या मशिन्सचे कंपन होऊ नये म्हणून दुसरे मशीन बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रथम मुलाला सीएचसी अथनेर येथे नेले जाईल. तेथून आयसीयूमध्ये हलवण्यात येणार आहे, मात्र सध्या आतून कोणताही प्रतिसाद येत नाही.

चार गावातील लोक मदतीसाठी जमले
ही घटना घडलेल्या मांडवी गावातील लोकांनी तसेच आसपासच्या 4 गावांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या बचावकार्यात सहभागी असलेल्या 200 हून अधिक लोकांसाठी मोफत जेवणापासून ते सर्व प्रकारची व्यवस्था गावकऱ्यांकडून केली जात आहे. प्रशासन सातत्याने मदतकार्यात व्यस्त असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आम्हीही प्रत्येक स्तरावर मदतीसाठी सहकार्य करत आहोत. तन्मयला हसत-खेळताना पाहणे हाच आमचा हेतू आहे.

बोअरवेलला समांतर 44 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यानंतर येथून बोगदा तयार करण्यात येत आहे. बोगदा तयार केल्यानंतर, मुलाला पायाच्या बाजूने बाहेर काढले जाईल.
बोअरवेलला समांतर 44 फूट खोल खड्डा खोदण्यात आला. यानंतर येथून बोगदा तयार करण्यात येत आहे. बोगदा तयार केल्यानंतर, मुलाला पायाच्या बाजूने बाहेर काढले जाईल.

तन्मयच्या सुरक्षेसाठी प्रार्थना
तन्मयच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थनाही सुरू आहे. संपूर्ण गावातील लोक त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. तन्मयसोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडवी येथील गायत्री मंदिरात गायत्री मंत्राचा जप केला.

बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला.
बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला.

खेळत असताना अचानक पडला

मांडवी गावात मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार, तन्मय मैदानात खेळत होता. याच दरम्यान त्याने बोअरवेलमध्ये डोकावण्याचा प्रयत्न केला असता तोल गेल्याने तो त्यात पडला. मूल न दिसल्याने सर्वजण बोअरवेलच्या दिशेने धावले. बोअरवेलच्या आतून मुलाचा आवाज आला. यावर कुटुंबीयांनी तत्काळ बैतूल व आठनेर पोलिसांना माहिती दिली.

बचावकार्य सुरू झाल्यानंतर, प्रथम मुलासाठी बोअरवेलमध्ये ऑक्सिजन पाईप टाकण्यात आला. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरा बोअरवेलमध्ये सोडण्यात आला. SDERF च्या टीम घटनास्थळी हजर झाल्या आणि मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

गुजरातमध्ये शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात शिवम हा दीड वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. ही घटना ध्रांगध्रा तालुक्यातील दुदापूर गावातील शेतात घडली आहे. खेळता खेळता शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. त्यावेळी त्याचे आई-वडील शेतात काम करत होते, मुलगा दिसत नसल्याने त्यांनी धाव घेतली. आजूबाजूला पाहिले असता बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाला घटनेची माहिती दिली. सुमारे 40 मिनिटांत सैनिकांनी त्या मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढले. रात्री 10.45 वाजता मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रुग्णवाहिकेत नेऊन त्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...