आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही हिजाब वाद थांबण्याऐवजी चिघळला आहे. कोर्टाकडून हिजाब घालण्यावर बंदी लावण्याच्या निर्णयाच्या एक दिवसानंतर बुधवारी शाळा-महाविद्यालये उघडली. याचिकाकर्त्या सहा विद्यार्थिनींसह इतरांनी कॉलेज आणि परीक्षेवर बहिष्कार घातला, तर मुस्लिम संघटनांनी मौन बाळगले.
दक्षिण कन्नडसह अनेक जिल्ह्यांत मुस्लिमांनी दुकाने, प्रतिष्ठाने बंद ठेवली. काही मुस्लिम संघटनांनी गुरुवारी कर्नाटक बंदचे आवाहन केले. याचदरम्यान उडुपी, चिकमंगळूर, शिवमोगासह इतर काही ठिकाणी निदर्शने करण्यात आली.
उत्तर कन्नड जिल्ह्यातील मुस्लिमबहुल भटकळ भागात दुकाने बंद ठेवण्यात आली. विजयनगरमध्ये अनेक शाळांच्या भिंतींवर स्प्रे पेंटद्वारे ‘हिजाब आमची प्रतिष्ठा आहे’, अशा घोषणा लिहिलेल्या होत्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.