आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परत #BoycottTanishq ट्रेंडींगमध्ये:कथित लव्ह जिहादच्या जाहिरातीनंतर तनिष्कची नवीन जाहिरातही वादाच्या भोवऱ्यात; हिंदू विरोधी प्रोपेगेंडा चालवण्याचा आरोप

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाटा ग्रुपचा ज्वेलरी ब्रांड तनिष्क परत एकदा आपल्या जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर ट्रोलर्स तनिष्कला बायकॉट करण्याची मागणी करत आहेत. ट्विटरवर परत एकदा #BoycottTanishq ट्रेंड करत आहे. तनिष्कने आपली नवीन जाहिरात एकत्वम ब्रांडसाठी जारी केली आहे.

या जाहिरातीमुळेही तनिष्कवर हिंदू विरोधी प्रोपेगेंडा चालवण्याचा आरोप लागत आहे. लोक याला अँटी हिंदू अॅड म्हणत आहेत. यापूर्वी तनिष्कने दिवाळीसाठी एक जाहिरात रिलीज केली होती, यावरुनही मोठा वाद झाला होता. या जाहिरातीतून लव्ह जिहाद आणि खोट्या धर्मनिरपेक्षता पसरवण्याचा आरोप लागला होता. यानंतर कंपनीने ही जाहिरात परत घेतली होती.

तनिष्कच्या नवीन जाहिरातीत काय आहे ?

तनिष्कच्या या नवीन दिवाळी अॅडमध्ये बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता, निमरत कौर, शायनी गुप्ता आणि अलाया फर्नीचरवाला एकतेचा संदेश देताना दिसत आहेत. त्या तनिष्कची ज्वेलरी घालून सांगत आहेत की, दिवाळी सणात काय करावे आणि काय करू नये. या जाहिरातीतून कोरोना काळात कशाप्रकारे दिवाळी साजरी करावी, याबाबतही सांगितले जात आहे. तनिष्ककडून दिवाळी कशी साजरी करावी, याबाबत सांगण्यात येत असल्यामुळे अनेकजण जाहिरातीवर टीका करत आहेत. तसेच, या अॅडला बॅन करण्याची मागणीही होत आहे.

सोशल मीडिया यूजर्स काय म्हणत आहेत ?

सोशल मीडिया यूजर्सचे म्हणने आहे की, आता तनिष्कच्या जाहिरातीने आम्हाला सांगावे, दिवाळी कशी साजरी करावी. कर्नाटकचे भाजप आमदार सीटी रवी यांनी ट्विटरवर तनिष्कवर टीका केली आहे. सोबतच, म्हटले की, कंपनीने आपले प्रोडक्ट विकण्यावर लक्ष्या द्यावे, लोकांना दिवाळी कशी साजरी करायची, ते शिकवू नये.

बातम्या आणखी आहेत...