आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरातच्या कच्छ जिल्ह्याच्या गांधीधाम येथील तनिष्कच्या एका शोरुमने तनिष्कच्या वादग्रस्त जाहिरातीबद्दल माफी मागितली आहे. शोरुमने 12 अक्टोबरला गेटवर हाताने लिहिलेली नोट चिटकवली - 'कच्छच्या हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे माफी मागतो. ही जाहिरात लाजिरवाणी होती.' शोरुमचा माफीनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सध्या ही जाहिरात यूट्यूब चॅनलवरुन हटवण्यात आली आहे.
दरम्यान शोरुमवर हल्ला झाल्याचे वृत्त होते. मात्र पोलिस आणि शोरुम मॅनेजरने शोरुमवर हल्ला झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. एसपी मयूर पाटील यांनी स्पष्ट केले की, कोणताही हल्ला झालेला नाही. तर स्टोर मॅनेजर राहुल मनुजा म्हणाले की, धमकीचे फोन आले मात्र हल्ला झालेला नाही.
या जाहिरातीत काय?
तनिष्कच्या या प्रमोशनल जाहिरातीमध्ये एका हिंदू मुलीला मुस्लिम कुटुंबाच्या सूनेच्या रुपात दाखवण्यात आले आहे. हिंदू मुलीचे मुस्लिम घरात लग्न झाले आहे आणि तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम दाखवण्यात आला आहे. यामध्ये हिंदू कल्चर लक्षात घेता मुस्लिम कुटुंब सर्व प्रथा-परंपरा हिंदू धर्मानुसार करत आहे.
जाहिरातीच्या शेवटी ती प्रग्नेंट महिला आपल्या सासूला विचारते, 'आई ही प्रथा तर तुमच्या घरात नसते ना?' यावर तिची सासू उत्तर देते की, 'पण मुलीला खूश करण्याची प्रथा तर सर्वच घरात असते ना?' व्हिडिओमध्ये हिंदू-मुस्लिम कुटुंबाची एकता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
तनिष्कने काय म्हटले?
या प्रकरणी आमच्या प्रश्नाच्या उत्तरावर तनिष्कने म्हटले की, प्रमोशनल जाहिरातींच्या माध्यमातून आम्हाला फक्त एकतेचा संदेश द्यायचा होता. कोणत्याही विशेष धर्म किंवा समुहाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. जर या जाहिरातीमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगीर व्यक्त करतो. आम्ही ही जाहिरात मागे घेत आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.