आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BPCL's Subsidized LPG Customers To Be Transferred To Indian Oil And Hindustan Petroleum

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरकारची नवीन योजना:BPCL चे सबसिडाइज्ड LPG ग्राहक इंडियन ऑइल आणि हिंदुस्तान पेट्रोलयमला ट्रांसफर केले जाणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच पेट्रोलियम मंत्रालय कॅबिनेटकडून मंजूरी घेणार

केंद्र सरकार सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) मधून आपली 100% भागीदारी विकणार आहे. आता सरकारने BPCL च्या सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)कडे ट्रांसफर करण्याची योजना आखली आहे. BPCL च्या खरेदीदाराची संभाव्य अडचण दूर करण्यासाठी ग्राहकांच्या हस्तांतरणाची योजना आहे.

कॅबिनेटकडून परवानगी घेतली जाणार

सबसिडाइज्ड LPG ग्राहकांना ट्रांसफर करण्यासाठी पेट्रोलियम मंत्रालय लवकरच कॅबिनेटची मंजूरी घेईल. ग्राहकांच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 3 ते 5 वर्षांचा वेळ लागू शकतो. वास्तविक सरकारी तेल कंपन्यांना सरकारकडून सबसिडीची रक्कम वेळेवर मिळत नाही. अनेकदा यात काही वर्षांचा वेळ लागतो. ऑटो फ्यूल्सची प्राइस डी-कंट्रोल केल्यानंतर आता कुकिंग गॅस, केरोसीन आणि उज्ज्वला योजनेच्या LPG कनेक्शनवर सबसिडी दिली जाते. BPCL कडे अंदाजे 7.3 कोटी LPG ग्राहक आहेत.

3 ते 5 वर्षापर्यंत BPCL ला विभाजित यूनिटचा दर्जा दिला जाईल

एक रिपोर्टनुसार, पेट्रोलियम मंत्रालयाने 3 ते 5 वर्षापर्यंत BPCL ला विभाजित युनिटचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारी भागीदारी विकल्यानंतर ग्राहकांना सबसिडी मिळत राहणार. केंद्र सरकारची 52.98% भागीदारी खरेदी करण्यासाठी 3-4 कंपन्यांनी बोली लावली आहे. यात वेदांता सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे. वेदांता पहिली अशी कंपनी आहे, जिने बोली प्रक्रियेत सहभागी असल्याचे कबुल केले. बोली लावण्याची अखेरची तारीख 16 नोव्हेंबर होती.

सरकारवर LPG सबसिडीची 27,000 कोटी रुपयांची बाकी

आर्थिक वर्ष 2020 अखेरपर्यंत सरकारवर LPG सबसिडीची अंदाजे 27,000 कोटी रुपयांची रक्कम बाकी आहे. यात IOC, BPCL आणि HPCL ची सरासरी बाकी 50:25:25 आहे. असे म्हटले जात आहे की, कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर BPCL चे नवीन ग्राहक सबसिडी व्यवस्थेचा विरोध करू शकतात. कंपनीच्या अॅनुअल रिपोर्टनुसार, आर्थिक वर्ष 2020 मध्ये BPCL चे 425 कोटी रुपये LPG सबसिडी म्हणून बाकी आहे.

BPCL कडे चार रिफायनरी

BPCL कडे देशभरात चार रिफायनरी आहेत. देशातील 250 मॅट्रिक टन रिफाइनिंग क्षमतेपैकी BPCL कडे 15% आहे. BPCL कडे 17,000 पेक्षा जास्त रिटेल आउटलेटचे नेटवर्क आहे. रिटेल मार्केटमध्ये BPCL ची एकतृतीशं भागीदारी आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser