आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूत वादग्रस्‍त फलकबाजी:जेएनयू इमारतींवर ब्राह्मण, बनियाविराेधी फलक

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) अनेक इमारतींवर गुरुवारी ब्राह्मण तसेच बनियाविराेधी घाेषणाबाजी लिहिलेले फलक आढळून आले. या समुदायांच्या विराेधात घाेषणाबाजीबराेबरच स्कूल आॅफ इंटरनॅशनल स्टडीजच्या दुसऱ्या इमारतीमध्येही ताेडफाेड करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात जेएनयू प्रशासनाकडून तत्काळ काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

भिंतीवरील काही घाेषणांत ‘ब्राह्मण परिसर छाेडाे, रक्तपात हाेगा, ब्राह्मण भारत छाेडाे-बनिया हम तुम्हारे पास बदला लेने आ रहे है’ असे लिहिलेले हाेते. या प्रकरणास डावे जबाबदार असल्याचे रा.स्व. संघाशी संबंधित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविप) म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...