आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ब्राम्हण मुख्यमंत्री पाहू इच्छितो या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री कोणत्या जातीच्या व्यक्तीने व्हावे हे म्हणणे योग्य नाही, तो कोणीही होऊ शकतो अगदी तृतीयपंथी पण होऊ शकतो असा दानवेंना टोला लगावला.
अजित पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री कोणत्या जातीच्या व्यक्तीने व्हावं असं म्हणणं योग्य नाही, तो कोणीही होऊ शकतो, तृतीयपंथी पण होऊ शकतो, किंवा कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. 145 चा बहुमताचा आकडा आणा आणि राज्याचे प्रमुख व्हा, असे म्हणत त्यांनी कोणी सांगेल की अमुक याने मुख्यमंत्री व्हावे, हे म्हणणे चुकीचे असल्याचे अजित पवार म्हणाले.
अर्जून खोतकरांची टीका
याच कार्यक्रमात दानवेंसोबत शिवसेनेचे नेते अर्जून खोतकरही होते, त्यांनी दानवेंच्या भाषणाला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, सध्या राज्याचे मुख्यमंत्री ब्राह्मणच असल्याची आठवण करुन दिली. सध्याचे मुख्यमंत्री परशुरामच आहे, याआधी मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुद्धा परशुरामच होते, त्यामुळे त्यामुळ करु वैगरे या भानगडी सोडून द्या' असा टोला अर्जुन खोतकर यांनी लगावला.
काय म्हणाले होते दानवे
ब्राह्मणाला केवळ मी नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पाहू इच्छित नाही तर ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री पाहू इच्छितो, असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या असं आवाहनी दानवे यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.