आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bravery Story : Who Is Colonel Ashutosh Sharma Martyred In Kashmir Handwara Gallantry Award Winner

शौर्याची कहाणी:ग्रेनेड लपवत दहशतवादी जवानांच्या दिशेने येत होता, कर्नल आशुतोष यांनी त्याला जवळून गोळी घातली; या शौर्यासाठी त्यांना गेल्या वर्षी सैन्य पदकाने सन्मानित केले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 राष्ट्रीय रायफल्सने चकमकीत आपले कमांडिंग ऑफिसर गमावण्याची ही दुसरी वेळ

(उपमिता वाजपेयी) 

काश्मिरच्या हंदवाडा येथे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा शहीद झाले. पण काश्मिरने कर्नल शर्मा यांचे शौर्य याआधी अनेकवेळा पाहिले आहे. एके दिवशी कर्नल आशुतोष शर्मा यांचे जवान रस्त्यावर तैनात होते. काश्मिरी पोशाख घातलेला एक दहशतवादी ग्रेनेड लपवत त्यांच्या दिशेने येत होता. कर्नल आशुतोष यांची तीक्ष्ण नजर त्या दहशतवाद्यावर पडली आणि त्यांनी त्याच्या अगदी जवळ जाऊन प्वाइंट ब्लँक रेंजने त्याला गोळी घातली.  

त्यानंतर कर्नल आशुतोष यांनी असे करून तेथे तैनात आपले आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या अनेक जवानांचा जीव वाचविला. जवळपास अडीच वर्षे ते 21 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग अधिकारी होते. गेल्या वर्षी कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांना या शौर्यासाठी सैन्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते. याआधीही त्यांना एकदा सैन्य पदक देण्यात आले आहे. 

कर्नल आशुतोष उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथील रहिवासी आहेत मात्र त्यांचे कुटुंब सध्या जयपूर येथे राहते. कुटुंबात पत्नी आणि 12 वर्षांची मुलगी आहे. 

2000 मध्ये याच युनिटने आणखी एक कमांडिंग ऑफिसर गमावला होता

21 राष्ट्रीय रायफल्सने आपला कमांडिंग ऑफिसर गमावण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 2000 मध्ये दहशतवाद्यांच्या आयईडी ब्लास्टमध्ये 21 आरआरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रजिंदर चौहान शहीद झाले होते. या घटनेत त्यांच्यासोबत ब्रिगेडियर बीएस शेरगिल आणि पाच जवानांना देखील वीरमरण आले होते. 

5 वर्षानंतर दहशतवाद्यांच्या चकमकीत कमांडिंग ऑफिसर शहीद

सैन्याने जम्मू-काश्मिरमध्ये पाच वर्षांनंतर दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कमांडिंग ऑफिसरला गमावले. याआधी 2015 मध्ये कुपवाडाच्या हाजीनाका जंगलात झालेल्या चकमकीत 41 राष्ट्रीय रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. ते महाराष्ट्रातील रहिवासी होते. कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती 2017 मध्ये सैन्यात दाखल झाली.

कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक 2017 मध्ये सैन्यात दाखल झाली.
कर्नल संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक 2017 मध्ये सैन्यात दाखल झाली.
बातम्या आणखी आहेत...