आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने निवृत्ती जाहीर केली आहे. सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया पुढील महिन्यात दुबईत होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेनंतर प्रोफेशनल टेनिसमधून निवृत्त होणार आहे. टेनिस वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत तिने ही माहिती दिली.
सानियाने तीनदा महिला दुहेरीचे ग्रँडस्लॅम आणि तीनदा मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. निवृत्तीपूर्वी ती या महिन्यात ऑस्ट्रेलिया ओपनच्या दुहेरीत सहभागी होणार आहे. सविस्तर बातमी येथे वाचा...
आजच्या इतर मोठ्या बातम्या वाचा...
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरण / आरोपी शिझान खान खानच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी
तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शिझान खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिझानने दाखल केलेल्या जामीन याचिकेवर न्यायालयाने पोलिसांकडून उत्तर मागितले होते. 2 ऑक्टोबर रोजी शिझानच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन तुनिषाच्या आईवर गंभीर आरोप केले होते. शिझानच्या बहिणींनी सांगितले की, तुनिषाची आई वनिता शर्मा खोटे बोलत आहे. तुनिषाला तिच्याच लोकांनी वाईट वागणूक दिली, त्यामुळेच ती डिप्रेशनमध्ये होती. वाचा सविस्तर...
अमेरिकेत 6 वर्षाच्या मुलाने शिक्षिकेवर वर्गात गोळी झाडली
अमेरिकेतील व्हर्जिनियामध्ये एका 6 वर्षाच्या मुलाने महिला शिक्षिकेवर वर्गात गोळ्या झाडल्या. यानंतर मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रमुखांनी सांगितले की, सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात नव्हता. शिक्षकाशी झालेल्या वादातून मुलाने जाणूनबुजून गोळीबार केला.
या घटनेत इतर कोणत्याही मुलांचा सहभाग नव्हता. गोळीबारानंतर शाळेत दहशतीचे वातावरण आहे. मुलाकडे बंदूक कोठून आली, ही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. अमेरिकेतील शाळांमध्ये गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सविस्तर वाचा...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.