आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांचे रविवारी पहाटे 5 वाजता प्रयागराज येथे निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. त्यांना डिसेंबरमध्ये हाताला फ्रॅक्चर आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उत्तर प्रदेशातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आजच्या इतर मोठ्या बातम्या...
चीनमधील जिआंगशी येथे भीषण अपघात; रस्ता अपघातात 17 ठार, 22 जखमी
चीनच्या जिआंगशी प्रांतात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथे रस्ते अपघातात 17 जणांचा मृत्यू झाला, तर 22 जण जखमी झाले. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात का आणि कसा घडला याचा तपास सुरू आहे.
जम्मूच्या बालाकोटमध्ये सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला, शोध मोहीम सुरू
जम्मू-काश्मीरमधील बालाकोटमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. राजौरी बॉम्बस्फोटात दोघांचा सहभाग होता. परिसराची नाकाबंदी करून सर्च ऑपरेशन केले जात आहे. दुसरीकडे, राजौरीतील डांगरी भागात झालेल्या टार्गेट किलिंगनंतर जम्मूमधील सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली आहे.
कर्नाटकातील श्रीराम सेनेच्या जिल्हाध्यक्षावर गोळीबार, चालकही जखमी
कर्नाटकमध्ये श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकिताकेरा आणि त्यांच्या ड्रायव्हरवर गोळ्या झाडण्यात आल्या. हिंडलगा गावात ही घटना घडली. या गोळीबारात दोघेही जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कोकीतकेच्या चेहऱ्यावर मार लागला आहे. दोघांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबार करणाऱ्याचा शोध अद्याप लागलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.