आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबिहारच्या नालंदा जिल्ह्यात लग्नानंतर अवघ्या काही तासांतच वर-वधूचा दुःखद अंत झाला. त्यानंतर एका क्षणातच 2 कुटुंबांच्या आनंदावर दुःखाचे विरजन पडले. ज्या कारमधून नवरदेव आपल्या नवरीला घेऊन जात होता, त्या कारला एका वेगवान ट्रॅक्टरने जोराची धडक मारली. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी फेकलेल्या कारमध्ये बसलेल्या वधू-वराचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात वराचा मेहुणा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून ट्रॅक्टरसह फरार चालकाचा शोध सुरू केला आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील गिरियाक पोलिस टाणे हद्दीतील पुरानी गावाजवळ ही दुर्दैवी घटना घडली.
यासंबंधीच्या माहितीनुसार, शुक्रवारी गिरियाकच्या सतुआ गावातील कारू चौधरी यांची मुलगी पुष्पा कुमारी (20 वर्षे) हिचा विवाह नवादा च्या महराना गावच्या श्याम कुमार (27 वर्षे) यांच्याशी झाला. शनिवारी दुपारी पुष्पा यांची पाठवणी करण्यात आली. इनोव्हा कारमधून श्याम आपली नववधू पुष्पा व मेहुण्यासह महराना गावाकडे निघाला होता.
वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दिली धडक
दुपारी 3-4 च्या सुमारास त्यांची कार पुरैनी गावाजवळ आली. तिथे वाळूची वाहतूक करणाऱ्या भरधाव वेगातील एका ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली. त्यात कार रस्त्याच्या खाली उतरली. या घटनेत वर श्याम व नववधू पुष्पा यांचा जागीच मृत्यू झाला. तर श्यामचा मेहुणा व गाडीचा चालक गंभीर जखमी झाला.
ट्रॅक्टर चालक फरार
या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून वधू-वरांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. तसेच गंभीर जखमी मेहुण्याला उपचारासाठी विम्स रुग्णालयात दाखल केले. कारला धडक दिल्यानंतर आरोपी चालक ट्रॅक्टरसह पळून गेला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
2 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर
या घटनेची माहिती कुटुंबीयांना समजताच सर्वत्र शोककळा पसरली. क्षणार्धात आनंदाचे रूपांतर दु:खात झाले. आम्ही मुलीला आनंदाने निरोप दिला होता. त्यानंतर असे अघटित घडेल याची कुणाला कल्पना होती, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
नागरिकांचे पोलिसांवर आरोप
सतौआत दररोज मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वाळू उत्खनन करणारे लोक ट्रॅक्टरमधून वाळू भरून रस्त्याने सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे नियमित अपघात होतात. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे पोलिसांशी संगनमत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
अपघाताशी संबंधित खालील बातमी वाचा...
वाहतूक ठप्प:मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर विचित्र अपघात, 11 गाड्या एकमेकांना धडकल्या; थोडक्यात जीवितहानी टळली
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. मात्र हा अपघात विचित्र पद्धतीने झाला आहे. यामध्ये 11 वाहने एकमेकांना धडकल्याची माहिती समोर येत आहे. एक चारचाकी अक्षरशः दुसऱ्या वाहनावर उभी आहे. याआधीही या मार्गावर अशाप्रकारचे अपघात झाल्याची माहिती आहे. या मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच आहे.
या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र 11 वाहने एकमेकांवर आदळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी विस्कळीत झालेली वाहतूक काही प्रमाणात ठिक केल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग पुन्हा सुरु झाला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.