आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brij Bhushan Sharan Singh Case Update Asian Wrestling Trial Schedule | Sonipat, Patiala, Bajrang Punia, Sakshi Malik, Vinesh Phogat

मोठा निर्णय:एकीकडे कुस्तीपटूंचा संप, दुसरीकडे समितीने आशियाई कुस्ती चाचणीसाठी अंडर-17 व 23 चे वेळापत्रक केले जाहीर

पानिपत15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेवरून जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचा संप आज 22 व्या दिवशीही सुरू आहे. दरम्यान, एडहॉक समितीने अंडर-17 आणि 23 आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

किर्गिस्तानमधील बिश्केक येथे 17 ते 20 मे दरम्यान होणाऱ्या स्पर्धेच्या चाचण्या होणार आहेत. ज्यामध्ये दररोज दोन ते तीन वजन श्रेणीच्या चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्या सोनीपत आणि पटियाला येथे होणार आहेत. एडहॉक समितीचचे सदस्य भूपेंद्र सिंह बाजवा हेही सोनीपतमध्ये उपस्थित राहणार आहेत.

चाचणी प्रसंगी हे राहणार उपस्थित

ज्यामध्ये सोनीपत मध्ये फ्री स्टाइल श्रेणी व पटियाला येथे ​​​​​ ग्रीको रोमन व महिला कुस्तीपटूंच्या चाचण्या होणार आहे. ​​​​​त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. तदर्थ समिती सदस्य भूपेंद्र सिंग बाजवा, SAI कुस्ती संघाचे मुख्य प्रशिक्षक जगमिंदर सिंग आणि अर्जुन पुरस्कार विजेते कुस्तीपटू रमेश कुमार गुलिया सोनीपत येथील चाचणी प्रक्रियेसाठी निवड समितीमध्ये उपस्थित राहणार आहेत. पटियाला येथे महिला आणि ग्रीको-रोमन कुस्तीपटूंच्या चाचण्यांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सुमा शिरूर, महासिंग राव आणि अर्जुन पुरस्कारप्राप्त अलका तोमर यांचा समावेश करण्यात आला आहे.

या बातम्या पण वाचा:-

भारतीय ऑलिम्पिक संघटनेचा मोठा निर्णय:कुस्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी अपात्र; कागदपत्रे मागवली, 45 दिवसांत निवडणुका

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी जंतरमंतरवर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा आज 21 वा दिवस आहे. दरम्यान, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (IOA) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले आहे. आयओएचे सहसचिव कल्याण चौबे यांनी कुस्ती संघटनेला आदेश जारी करून सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रशासकीय, आर्थिक कामांवर बंदी घातली आहे. - येथे वाचा संपूर्ण बातमी