आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्लीच्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या धरणे आंदोलनात बुधवारी मध्यरात्री पैलवान आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. ‘आप’नेते सोमनाथ भारती फोल्डिंगचे बेड घेऊन समर्थकांसह आले होते. पोलिसांनी त्यांना रोखले तेव्हा पावसात गाद्या भिजल्याने बेड ठेवण्याची परवानगी पैलवानांनी मागितली.पोलिसांनी त्यांची मागणी फेटाळताच गोंधळास सुरुवात झाली. पोलिसांनी धक्काबुक्की, शिवीगाळ केली. एक-दोन पोलिस मद्यधुंद होते, असा आरोप पैलवानांनी या वेळी केला. तर, माझा धाकटा भाऊ दुष्यंत याचे डोके फोडले असा आरोप गीता फोगटने केला. दरम्यान, आप नेते सोमनाथ भारती यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पैलवानांनी आपल्या समर्थकांना रातोरात आंदोलनस्थळी येण्याचे आवाहन केले आहे. तत्पूर्वी, दिवसा दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी पैलवानांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. पोलिसांनी सुमारे ५० विद्यार्थी-विद्यार्थिनींना फरपटत नेले. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
पी.टी.उषा यांनी अांदोलनस्थळी जाऊन घेतली पैलवानांची भेट
नवी दिल्ली | जंतर-मंतरवर पैलवानांचे आंदोलन ११ व्या दिवशीही सुरू होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांनी बुधवारी पैलवानांची भेट घेतली. आपणास योग्य तो न्याय मिळेल असे आश्वासन देऊन आंदोलन संपवण्याचे आवाहन त्यांनी केले. यापूर्वी पैलवानांचे आंदोलन शिस्तभंग असून त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळली असल्याचे वक्तव्य उषा यांनी केले होते. भेटीनंतर बजरंग पुनिया म्हणाला की, पी.टी.उषा मूलत: एक खेळाडू आहेत. त्या आमच्या पाठीशी असून आम्हाला न्याय मिळवून देतील असा विश्वास आहे. परंतु भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना तुरुंगात पाठवल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात येईल, असेही पुनियाने ठणकावून सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.