आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WFI अध्यक्षांचा VIDEO:​बृजभूषण म्हणाले- बजरंग-विनेशचा गेम संपला, कोणावरही वाईट नजर टाकली नाही, हुड्डाने प्रियांकांची दिशाभूल केली

पानीपत, नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय कुस्तीपटू संघाचे (WFI) चे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ खापांच्या महापंचायती दरम्यानच एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओमध्ये WFI अध्यक्षांनी विविध आरोपांचे खंडन केले. तसेच खाप नेत्यांना आवाहन केले की, मुलांकडून चुक होऊ शकते. पण तुम्ही ती चूक करू नका. बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा खेळ संपला. ज्या दिवशी दिल्ली पोलिसांचा तपास पूर्ण होईल आणि मी दोषी आढळून येईल, तेव्हा मी व्यक्तिगतरित्या तुमच्या सर्वांमध्ये येईन. तेव्हा तुम्ही सर्वजण मला बूटांनी मार देत संपवून टाका.

व्हिडिओत काय म्हटले बृजभूषण वाचा सविस्तर.....

36 मिनिटे 9 सेकंदाचा हा व्हिडिओ बृजभूषण सिंह यांनी त्यांच्या कारमध्ये शूट केला आहे. आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये बृजभूषण म्हणाले की, मी खासदार आहे आणि लोक मला कुस्ती अध्यक्ष म्हणूनही ओळखतात. मी आत्ता दिल्लीहून लखनऊला घरी जात आहे. मी हरियाणातील खाप पंचायतींच्या ज्येष्ठांना, विशेषत: जाट समाज आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील जाट समाज बांधवांना 'राम-राम' घालतो. विशेषतः ज्यांची मुलं कुस्ती करतात त्यांना. ते म्हणाले की, व्हिडीओ बनवण्याचा माझा कोणताही हेतू नसला तरी माझा मुद्दा तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, हा त्या मागील उद्देश आहे....

तयारी न करता कारमध्येच बनवला व्हिडिओ
बृजभूषण म्हणाले की, मी खूप तयारी करून व्हिडिओ बनवत नाही. आता गाडीत बसून विचार केला की, वडीलधाऱ्यांपर्यंत माझे म्हणणे पोहोचवावे. एक कविता आहे. ''बात ऐसी करो जिसका आधार हो...जिसमें सिद्धांत हो। दादा-ताऊ-चाचा, मेरे ही बच्चे मेरे ऊपर आरोप लगा रहे हैं। वे यह भी नहीं बता पा रहे कि कौन-सा दिन है, कौन-सी तारीख थी, कौन-सा समय था। मैं क्या कहूं...कैसी कहानी बनाई? क्यों बनाई?'' हे तुम्हाला समजेल.

बृजभूषण सिंह म्हणाले, ही लढाई या भूतकाळातील पैलवानांशी आहे. मी ही लढाई तुमच्या लहानश्या मुलांसाठी लढत आहे. जे आंदोलन करत आहेत, त्यांना द्रोणाचार्य, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, सर्व मिळाले आहेत. पण जे गरीब कुटुंबातून बाहेर पडून ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे स्वप्न घेऊन चालत आहेत. जी कुटुंबे आपल्या मुलांचे भवितव्य घडवण्यासाठी आपल्या गरजा बाजूला ठेवून पदरमोड करून वेळप्रसंगी कर्ज काढून बदाम-तुपाची व्यवस्था करत आहात. त्यांना मी सांगू इच्छितो की हा लढा तुमच्या मुलांसाठी आहे.

खापांना विनंती, गावातील कोणत्याही कुस्तीपटू मुलीला माझ्याबद्दल विचारा
तुम्ही दिल्लीत येऊ नका, असे मी खापांना मुळीच म्हणत नाही, असे बृजभूषण यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे. जे मनात येईल ते करा. आमचेही ऐकू नका, पण तुमच्या मुलींपैकी कुणी कुस्ती खेळत असेल तर तिला 1 मिनिट एकटीला फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून तिला विचारा. बृजभूषण यांच्यावर होत असलेले आरोप हे खरे आहेत का, ते खरे असतील तर तुम्हाला वाट्टेल ते करा. मला माहित नाही, पण मी स्वतःला ओळखतो.

WFIचे अध्यक्ष म्हणाले की, त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही कोणत्याही मुला-मुलीकडे वाईट नजर टाकली नाही. ते चुकीच्या पद्धतीने वागलो नाही. असे असूनही, मी 4 महिन्यांपासून माझ्यावरील आरोप सहन करत आहे.

एका कार्यक्रमात बृजभूषण सिंह यांनी एका खेळाडूच्या कानशिलात लगावली होती.
एका कार्यक्रमात बृजभूषण सिंह यांनी एका खेळाडूच्या कानशिलात लगावली होती.

मी प्रियांका गांधींचा आदर करतो, हुड्डा कुटुंबाने दिशाभूल केली
बृजभूषण म्हणाले, मी पहिल्याच दिवशी सांगितले होते की, माझा एकही गुन्हा सिद्ध झाला तर मला फाशी होईल. हे प्रकरण दिल्ली पोलिसांकडे विचाराधीन आहे, त्यामुळे उघडपणे बोलू शकत नाही. माझे वय 65 आहे. मी आयुष्यातले सगळे चढ-उतार पाहिले आहेत. मी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींचा आदर करतो, पण हुड्डा कुटुंबाने त्यांची दिशाभूल केली. जेव्हा त्यांना सत्य समजेल तेव्हा त्यांना स्वतःवर नाही तर भूपेंद्र आणि दीपेंद्र हुड्डा यांच्यावर राग येईल.

भाजप खासदार म्हणाले की, मी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांना कधीही, कुठेही भेटले, तर मी त्यांच्या पायांना स्पर्श करतो. डब्ल्यूएफआयच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दीपेंद्र हुड्डा यांचा पराभव केला, परंतु कधीही त्यांचा आदर गमावला नाही. हा आरोप माझ्यावर नाही तर भारताच्या कुस्ती देवतेवर लावण्यात आला आहे. माझ्यावर नाही, प्रत्येक महिला खेळाडूवर आरोप झाले आहेत. राकेश टिकैत हे यूपीचे रावणसाहेब आहेत.

कुस्तीसाठी 25-30 कोटी रुपये स्वतः खर्च केले
बृजभूषण म्हणाले की, असा एकही खेळाडू नाही ज्याने माझ्याकडून डॉलर घेतले नाहीत. कारण, मी घोषणा केली होती की, जर कोणत्याही खेळाडूने सुवर्णपदक आणले तर मी त्याला 200 डॉलर देईल. मी रौप्यपदक विजेत्याला 150 डॉलर आणि कांस्यपदक विजेत्याला 100 डॉलर देण्याची देखील घोषणा केली. मी माझ्या खिशातून 25-30 कोटी रुपये कुस्तीवर खर्च केले.

पुढे बोलताना बृजभूषण म्हणाले की, कुस्ती स्पर्धेत जेव्हा जेव्हा एखादी आई आपल्या मुला-नातवासोबत आखाड्यात यायची तेव्हा मी सगळ्या मुलांना सांगायचो की, तुम्हाला कुस्तीत पुढे जायचे असेल तर हरियाणातून आलेल्या या वृद्ध आईचे चरणस्पर्श करा. त्यानंतर तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. मी त्या वृद्ध आईला माझ्याजवळ बसवायचे.

कुस्तीचे नियम बदलल्याने वादाला तोंड
बृजभषण यांनी दावा केला आहे की, त्यांनी कुस्तीशी संबंधित काही नियम बदलले. ज्यामुळे संपूर्ण वाद सुरू झाला. ते म्हणाले, मी ठरवले की, जी मुले खालच्या पदावर आहेत. त्यांनाही मोठे करायचे. त्यांनाही संधी मिळायला हवी. गरीब कुटुंबातील मुलांसाठी जास्तीत जास्त काम करता यावे म्हणून मी चाचणी प्रणाली सुरू केली. परंतू उंची गाठलेल्या या खेळाडूंना आता थेट उंची गाठलेल्या या खेळाडूंना परदेशात तिकीटाची अपेक्षा आहे.

सहा वेळा खासदार, हॉर्स रायडिंगची आवड असलेले बृजभूषण यांचे लाईफस्टाईल वेगळी आहे.
सहा वेळा खासदार, हॉर्स रायडिंगची आवड असलेले बृजभूषण यांचे लाईफस्टाईल वेगळी आहे.

विशेष सुविधा दिल्या म्हणूनच पारितोषिक मिळाले
डब्ल्यूएफआय अध्यक्ष म्हणाले की, आरोप करणाऱ्या खेळाडूंना मी विशेष सुविधा दिल्या नसत्या तर त्यांना पदके मिळाली नसती. बजरंग पुनिया-विनेश फोगट यांनी पूर्ण चाचणी घेतली असती आणि त्यांचे व्हिडिओ जारी केले असते, तर सर्वांना कळले असते. साक्षीही विसरली. एका प्रशिक्षकाने साक्षीला एक गुण दिला जेव्हा तिला 4 गुण मिळायचे होते. मी प्रशिक्षकाला 4 गुण देण्यास सांगितले. जर या तिघांना विशेष सुविधा दिल्या नसत्या तर आज ते इथे आले नसते.

मी चौधरी नव्हे, 6 ते 7 वेळा निवडणूक जिंकलो : बृजभूषण
बृजभूषण म्हणाले की, माझा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला आहे. मी काही फार मोठा चौधरी लागून गेलो नाही. मी काही मोठा शेतकरी नाही. मी 6 ते 7 वेळा निवडणूक जिंकली आहे. असे म्हणतात की, उंची गाठणे सोपे आहे. परंतू तिथे टिकणे फार कठीण आहे. लोक मुर्ख नसतात. जर मी एखाद्याला माझ्या जनता स्टार बनवत असेल तर तर त्यात काही तथ्य असेल ना.

हे ही वाचा

कुस्तीपटूंना समर्थन:खापची आज महापंचायत, दीर्घ काळ संपाच्या तयारीने आले शेतकरी; बृजभूषण म्हणाले- तुम्ही चूक करू नका

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटूंचा संप आज ​15 व्या दिवशी देखील सुरू आहे. दुसरीकडे आज कुस्तीपटूंना समर्थन देण्यासाठी जंतर-मंतरवर महापंचायत होणार असून, त्यात देशभरातील विविध खाप पोहोचले आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी

6 वेळा खासदार, 50 हून जास्त शाळा-कॉलेज:SPवर पिस्तूल रोखले, पैलवानाच्या कानशिलात हाणली; बृजभूषण सिंहांची रंजक कहाणी

गुंडगिरी अशी की पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयातच त्यांच्यावर पिस्तूल रोखले. राजकारण असे की सलग 6 वेळा खासदारकीची निवडणूक जिंकले. व्यवसाय असा की 50 हून जास्त शाळा-महाविद्यालयांचे मालक आहेत. वट अशी की पार्टी लाईन सोडून विधाने करतात. दबदबा असा की 11 वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. - येथे वाचा संपूर्ण बातमी