आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brijbhushan Singh |ayodhya Visit |raj Thackeray Should Apologize Orders Of Hindu Dharmacharya

राज ठाकरे अयोध्या दौरा साधू-महंतांची बैठक:महंत म्हणाले - उत्तर भारतीयांचा अपमान करणारा अद्याप जन्मलेला नाही

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन मनसे प्रमुख राज ठाकरे हे चर्चेत आहेत. नुकतेच त्यांनी आपल्या अयोध्या दौऱ्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांच्या या दौऱ्यावरुन वाद निर्माण झाला आहे. उत्तर प्रदेशची माफी मागावी अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका घेत भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी घेतली आहे. तसेच त्यांनी यूपीमध्ये मोठे शक्तीप्रदर्शन केले आहे.

राज ठाकरे यांच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी साधू महंत यांची बैठक घेतली जात आहे. या बैठकीमध्ये हिंदू धर्माचार्य या नात्याने राज ठाकरेंना माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज ठाकरेंनी माफी मागितली तर आज जेवढे लोक आहेत तेवढ्याच संख्येने त्यांचे स्वागत करण्यासाठी तयार राहू असे साधू महंतांनी म्हटले आहे. मराठी मुद्द्यावरुन राज ठाकरे उत्तर भारतीयांना नेहमीच लक्ष्य करत असताता. आता त्यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत अयोद्धा दौऱ्याची घोषणा केली आहे. यामुळे तेथील राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे.

...तर त्यांना ‘छटी का दुध याद दिलाएंगे’

सभेमध्ये उपस्थित असलेले महंत म्हणाले की, 'माझ्या हातामध्ये धर्मदंड आहे. आम्ही राज ठाकरेंना हे सांगायला आलो आहोत की त्यांनी याआधी उत्तर भारतीयांचा अपमान केला आहे. त्या अपमानासाठी माफी मागावी. राज ठाकरेंनी माफी मागितली, तर त्यांचे स्वागत केले जाईल. त्यांनी माफी मागितली नाही, तर त्यांना ‘छटी का दुध याद दिलाएंगे’. उत्तर भारतीय लोकांचा अपमान करणारा कोणताही‘माई का लाल’ अद्याप जन्माला आलेला नाही.

माफी मागितली तरच जनतेचा राग कमी होईल

खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, 'राज ठाकरे माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना अयोध्येमध्ये पाऊल ठेवू देणार नाही. राज ठाकरेंचा विरोध करण्यासाठी 5 लाख लोक उभे राहतील. राज ठाकरे विमानातून येवोत किंवा रेल्वेतून त्यांना उतरू देणार नाही. माफी मागितली तरच जनतेचा राग कमी होईल. राजकारणासाठी आम्ही हे करत नाही. हे जात, धर्माचे आदोलन नाही. राज ठाकरे माफी मागत नसतील तर त्यांनी महाराष्ट्रातच राहावे. आमची माफी मागितली नाही तरी चालेल मात्र संतांची माफी त्यांना मागावी लागेल.'

बातम्या आणखी आहेत...