आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या तंत्रज्ञानाचा विचार:रांगा कमी करण्यासाठी उपग्रह आधारित टोल आणू : गडकरी

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार टोल प्लाझाला बदलण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा विचार करत आहे. नवीन प्रणाली सहा महिन्यांत सादर केली जाईल, अशी माहिती परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी राज्यसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या सत्रात त्यांनी हे स्पष्ट केले. या प्रणालीसाठी दोन पर्यायांची तयारी केली जात आहे. उपग्रहाधारित टोल प्रणालीत कारमध्ये जीपीएस असेल व टोल थेट प्रवाशाच्या बँक खात्यातून कापून घेतला जाईल. दुसरा पर्याय नंबर प्लेटचा आहे. उपग्रहाचा वापर करून आम्ही फास्टॅगऐवजी जीपीएस लावण्याच्या विचारात आहोत. टोल घेतला जाऊ शकतो. मी टोल टॅक्सचा जनक : गडकरी म्हणाले, मी देशातील एक्स्प्रेस-वे वरील ‘टोल टॅक्सचा जनक आहे. कारण १९९० च्या दशकाच्या अखेरीस राज्य मंत्री म्हणून महाराष्ट्रात अशा प्रकारचा पहिला मार्ग तयार केला होता.

बातम्या आणखी आहेत...