आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Britain Approves Covishield Vaccine After India's Signal To Respond; News And Live Updates

मंजुरीनंतरचे नियम:प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या इशाऱ्यानंतर ब्रिटनने दिली कोविशील्ड लसीला मान्यता; रवाना होण्याआधी कोविड चाचणीपासून सूट

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 10 दिवस क्वॉरंटाइनची गरज नाही

प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या इशाऱ्यानंतर अखेर ब्रिटनने सीरमच्या कोविशील्डला लसीला मान्यता दिली आहे. ब्रिटनमध्ये ४ ऑक्टोबरपासून इतर देशांतून येणाऱ्यांसाठी हे नवे नियम लागू होत आहेत. ब्रिटनने ट्रॅव्हल अॅडव्हायझरीत बदल करत कोविशील्डचा स्वीकृत लसींच्या यादीत समावेश केला. नव्या दिशानिर्देशांनुसार अॅस्ट्राझेनेका कोविशील्ड, अॅस्ट्राझेनेका व्हॅक्सजेव्रिया आणि मॉडर्न टकेडाला स्वीकृत लस मानण्यात आले आहे.

तथापि, भारतात मंजूर कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक अजूनही ब्रिटनच्या स्वीकृत यादीत समाविष्ट नाहीत. या लसींचा डोस घेणाऱ्या भारतीय प्रवाशांना वेगळ्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल. तथापि, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक ही लस घेणाऱ्यांना ‘नॉन व्हॅक्सिनेटेड’च मानले जाईल. त्यांना रवाना होण्याआधी आणि पोहोचल्यानंतर आठव्या दिवशी चाचणी करून घ्यावी लागेल. तसेच १० दिवस क्वाॅरंटाइन राहावे लागेल.

मंजुरीनंतरचे नियम

  • इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर कोविडच्या दोन चाचण्या कराव्या लागतील.
  • ४८ तासांत आपल्या संपर्क पत्त्याची माहिती द्यावी लागेल.
  • इंग्लंडला पोहोचल्यानंतर २ दिवसांत कोविड चाचणी करावी लागेल
बातम्या आणखी आहेत...