आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराफरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा होताना दिसत आहे. नीरवला परत आणण्यासाठी भारतीय एजन्सींनी सरकारी आणि कायदेशीर पातळीवर अपील दाखल केले होते. यामध्ये नीरवने भारताच्या बँकिंग व्यवस्थेशी फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यामुळे कायदेशीर प्रक्रियेसाठी त्याला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देण्याची मागणी करण्यात आली होती.
लंडनमध्ये ऐशारामात जगणाऱ्या नीरव मोदीने आपल्या बचावात अनेक युक्तिवाद केले. नीरव म्हणाला की, तो भारतीय कायद्याला सामोरे जाण्यास तयार आहे, पण त्याला भारतीय एजन्सींच्या ताब्यात देऊ नये. कनिष्ठ न्यायालयाने त्याला भारताच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता उच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळून लावली आहे.
नीरव म्हणाला होता - भारतातील तुरुंगांची स्थिती अत्यंत वाईट
नीरवने याचिकेत म्हटले होते की, भारतातील तुरुंगांची स्थिती अत्यंत वाईट आहे आणि त्याच्या जिवाला धोका होऊ शकतो. प्रत्युत्तरात भारतीय एजन्सींनी लंडन कोर्टाला संपूर्ण माहिती दिली आणि सांगितले की, नीरव फक्त पळून जाण्याचा मार्ग शोधत आहे. याआधारे त्याला भारताच्या ताब्यात देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नीरवला भारताकडे सोपवण्याचा निर्णय अन्यायकारक नाही आणि तो दबाव म्हणूनही घेतला जाऊ नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
14,500 कोटींच्या फसवणुकीचा आरोप
नीरव मोदी आणि मेहुल चौकसी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेची (PNB) 14,500 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. फेब्रुवारीमध्ये ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने मोदीच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली होती. या निर्णयाविरोधात त्याने लंडन उच्च न्यायालयात अपील केले होते. भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईतील आर्थर रोड कारागृहातील बॅरेक क्रमांक 12 मध्ये ठेवण्यात येणार आहे.
शेवटी मला तुरुंगातच मरावे लागेल
यापूर्वी नीरव मोदीने भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिल्यास तो वाचू शकणार नाही, असे म्हटले होते. लंडनच्या तुरुंगात कैद असलेल्या नीरवने मानसोपचार तज्ज्ञांना सांगितले की, जर त्याला भारतात प्रत्यार्पण केले गेले, तर त्याला एकतर मारले जाईल किंवा आत्महत्या होईल. शेवटी मला तुरुंगातच मरावे लागेल, असे त्याने सांगितले होते.
नीरव मोदी ज्या तुरुंगात राहणार तिथे काय-काय असेल?
महाराष्ट्राच्या तुरुंग विभागाने 2019 मध्येच लंडनमधील वेस्टमिन्स्टर कोर्टातील बॅरेक क्रमांक-12 ची माहिती शेअर केली होती. नीरव मोदीला ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे ती जागा उच्च सुरक्षा पुरवलेली असेल आणि त्याला तेथे वैद्यकीय सुविधाही मिळेल, असे तुरुंग विभागाने सांगितले होते. ऑगस्ट 2020 मध्ये वेस्टमिन्स्टर कोर्टाने बरॅक नंबर-12 चा व्हिडिओदेखील पाहिला होता.
त्यानंतरच न्यायालयाने नीरवला भारतात आणण्याची परवानगी दिली. नीरव मोदी बरॅक क्रमांक-12 मध्ये पूर्णपणे सुरक्षित असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसून त्याला भारतात पाठवल्यास तो आत्महत्या करेल, असा नीरवचा युक्तिवाद होता. यावरही न्यायालयाने म्हटले की, नीरवने बॅरेक क्रमांक-12 मध्ये आत्महत्या करण्याची कोणतीही शक्यता नाही, कारण तेथे त्याच्या प्रकृतीची पूर्ण काळजी घेतली जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.