आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या महाराणींची प्रकृती नाजूक:एलिझाबेथ द्वितीय वैद्यकीय निगराणीखाली; ब्रिटीश PM म्हणाल्या - संपूर्ण देश शाही कुटुंबासोबत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्या 96 वर्षांच्या आहेत. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवले आहे. बकिंघम पॅलेसने एलिझाबेथ यांच्या प्रकृतीविषयी एक निवेदन जारी केले आहे. AP च्या वृत्तानुसार, डॉक्टरांनी महाराणींच्या आरोग्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्यावर स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये उपचार सुरू आहेत. 'द टेलीग्राफ'च्या वृत्तानुसार, एलिझाबेथ यांच्या कुटुंबातील सदस्य गोळा होण्यास सुरूवात झाली आहे.

ब्रिटीश पंतप्रधान लिझ ट्रस यांनीही या वृत्तावर चिंता व्यक्त केली आहे. त्या एका ट्विटद्वारे म्हणाल्या - 'बकिंघम पॅलेसच्या वृत्ताने अवघा देश चिंताग्रस्त झाला आहे. माझ्या व संपूर्ण देशाच्या जनतेच्या भावना सध्या महाराणी व त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत.'

हे छायाचित्र रॉयटर्सने जारी केली आहे. स्कॉटलंडच्या बाल्मोरल कॅसल इमारतीच्या बाहेर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेत.

बकिंघम पॅलेसची गार्ड चेंजिंग सेरेमनी रद्द

लंडनच्या बकिंघम पॅलेसमध्ये होणारी गार्ड चेजिंग सेरेमनी रद्द करण्यात आली आहे. सेरेमनीवेळी ज्या ठिकाणी पर्यटक गोळा होतात, त्या ठिकाणी एक बोर्ड लावण्यात आला आहे.

बकिंघम पॅलेसवर लावण्यात आलेला साइन बोर्ड. येथेच उद्या पारंपरिक गार्ड चेजिंग सेरेमनी होणार होती.

तत्पूर्वी, महाराणींच्या प्रीव्ही काउंसिल म्हणजे गुप्त माहितीशी संबंधित मंत्रिमंडळाची व्हर्चुअल बैठकही रद्द करण्यात आली होती.

हे छायाचित्र 6 सप्टेबर म्हणजे 2 दिवसांपूर्वीचे आहे. तेव्हा ब्रिटनच्या नव्या पंतप्रधान लिझ ट्रस महाराणींकडून शपथ घेण्यासाठी गेल्या होत्या. हा फोटो तेव्हा जारी करण्यात आला होता.

महाराणींच्या आयुष्याशी संबंधित महत्वाची छायाचित्रे...

एलिझाबेथ यांचा जन्म 21 एप्रिल 1926 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अल्बर्ट ड्यूक ऑफ यॉर्क व आई एलिझाबेथ बोवेस-लियोन होत्या.

हे छायाचित्र एलिझाबेथ यांचे आहे. तेव्हा त्या 2 वर्षांच्या होत्या. त्या अल्बर्ट व बोवेस-लियोन यांच्या पहिल्या अपत्य होत्या.

4 वर्षीय एलिझाबेथ ऑलिंपियातील एका रॉयल स्पर्धेला गेल्या होत्या. हे छायाचित्र तेव्हाचे आहे. त्या अनेकदा ऑलिंपिया इंटरनॅशनल हॉर्स शोमध्ये जात असे.

हे चित्र एलिझाबेथ व त्यांच्या भगिणी मार्गारेट रोझचे आहे. मार्गारेटचा जन्म 1930 मध्ये झाला. दोघांचेही शिक्षण घरीच झाले.

14 वर्षीय प्रिन्सेस एलिझाबेथ यांनी रेडिओ कार्यक्रम चिल्ड्रेन्स अवरच्या माध्यमातून दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन सोडावे लागलेल्या मुलांसाठी संदेश जारी केला होता.

एलिझाबेथ 1937 मध्ये गर्ल गाईड बनल्या. या फोटोमध्ये त्यांनी गर्ल गाईडचा गणवेश परिधान केला आहे. गर्ल गाईड ही सेवाभावी संस्था आहे.

एलिझाबेथ यांनी 20 नोव्हेंबर 1947 रोजी ग्रीसचे युवराज फिलिप यांच्याशी लग्न केले. फिलिप ग्रीस व डेन्मार्कचे प्रिन्स अँड्र्यू व बॅटनबर्गची राजकुमारी अॅलिस यांचे एकुलते एक अपत्य होते.

हे छायाचित्र राणी एलिझाबेथ द्वितीय व त्यांचे पती फिलिपचा आहे. ते 2 जून 1953 रोजी बकिंघम पॅलेसमध्ये राणीच्या राज्याभिषेकाच्या वेळी किंवा मुकुटारोहणावेळी घेण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...