आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वंदे भारत'ने बुलेट ट्रेनचा विक्रम मोडला:52 सेकंदांत ताशी 0 ते 100KM चा वेग; अहमदाबादहून मुंबईला 5 तासांत पोहोचली

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या पहिल्या सेमी हायस्पीड व नव्या वंदे भारत रेल्वेने चाचणीमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या रेल्वेने अवघ्या 52 सेकंदांत ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडत बुलेट ट्रेनला मागे टाकले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. ही देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ती अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणार आहे.

वैष्णव म्हणाले की, वंदे भारत ट्रेनची तिसरी चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. त्यात रेल्वेने अवघ्या 52 सेकंदांत 0 ते 100 किमीपर्यंतचा वेग पकडला. बुलेट ट्रेन एढा वेग पकडण्यासाठी 54.6 सेकंदांचा अवधी घेते. नव्या रेल्वेचा कमाल ताशी वेग 180 किमी आहे. जुन्या वंदे भारत रेल्वेचा कमाल वेग ताशी 160 किमी आहे.

अहमदाबादहून मुंबईला 5 तासांत पोहोचली

नव्या वंदे भारत रेल्वेची शुक्रवारी अहमदाबाद -मुंबई दरम्यान चाचणी घेण्यात आली. ही रेल्वे अहमदाबादहून सूरतला अवघ्या 2 तास 32 मिनिटांत पोहोचली. एवढे अंतर कापण्यासाठी शताब्दी एक्सप्रेसला 3 तास लागतात. अहमदाबादहून सकाळी 7.06 वा. रवाना झालेली ही रेल्वे सूरत स्थानकावर सकाळी 9.38 वा. पोहोचली. येथे न थांबता ती मुंबई सेंट्रलमध्ये दुपारी 12.16 वा. पोहोचली. रेल्वेला अहमदाबादहून मुंबईतील 492 किमीचे अंतर कापण्यासाठी अवघे 5 तास 10 मिनिटे लागली. शताब्दी एक्सप्रेसला हे अंतर कापण्यासाठी 6 तास 20 मिनिटांचा अधी लागतो.

वंदे भारत रेल्वेचे वैशिष्ट्ये

रेल्वे मंत्रालयाच्या सूत्रांच्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेसच्या नव्या डिझाइनमध्ये फोटोकॅटलिटिक एअर प्युरिफायर सिस्टम असून, ते 99 टक्के किटाणू व व्हायरसला मारू शकते. या रेल्वेत विमानासारख्या अनेक सुविधा आहेत. एसी, टीव्ही, स्वयंचलित दरवाजे, हायक्लास पँट्री व वॉशरूम आदी अनेक सुविधा या रेल्वेत आहेत. वंदे भारत पूर्णत: स्वदेशी रेल्वे आहे.

रेल्वेत सेल्फ प्रोपेल्ड इंजिन आहे. म्हणजे या रेल्वेला वेगळे इंजिन लावण्याची गरज नसते. एक्झिक्युटिव्ह कोचच्या सीट्स 180 डिग्री कोनात फिरू शकते. नव्या रेल्वेत क्वालिटी व रायडिंग इंडेक्समध्ये सुधारणा झाली आहे. या मापदंडांवर ट्रेनचा स्कोअर 3.2 असून, जागतिक पातळीवरील सर्वात चांगला स्कोअर 2.9 आहे. ही रेल्वे ऑक्टोबरपासून रुळावर धावण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...