आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brother And Sister Met For The First Time In Kartarpur Sahib, Latest News And Update

​​​​​​​करतारपूर साहिबमध्ये प्रथमच भेटले बहीण-भाऊ:​​​​​​​फाळणीवेळी पाकमध्ये गेले होते मुस्लिम कुटुंब; भारतात हरवलेला भाऊ शिख कुटुंबात वाढला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील श्री करतारपूर साहिबमध्ये बुधवारी फाळणीवेळी एकमेकांपासून दुरावलेल्या बहीण-भावाची प्रथमच भेट झाली. यावेळी शिख भाऊ व मुस्लिम बहिणीने एकमेकांना अलिंगन देत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. त्यांची भावपूर्ण कथा जेव्हा लोकांना समजली, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतूनही अश्रू ओघळले. या कुटुंबाची 1947 च्या फाळणीवेळी ताटातूट झाली होती.

प्रथम जाणून घेऊया या कुटुंबाची ताटातूट होण्याची कहाणी

65 वर्षीय कुलसूम पाकिस्तानच्या फैसलाबादेत राहतात. त्यांचे कुटुंब 1947 च्या फाळणीवेळी जालंधरहून पाकमध्ये स्थायिक झाले होते. कुलसूम यांनी सांगितले - फाळणीनंतर 10 वर्षांनी पाकमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना सांगितले की, फाळणीवेळी त्यांचा एक भाऊ व बहीण जालंधरमध्ये हरवले होते. आईला जेव्हाही आपल्या या बेपत्ता मुलांची आठवणे येत असे, तेव्हा ती खूप रडत होती. माझ्या या भावंडांशी कधी भेट होईल, असे मला स्वप्नातही वाटले नव्हते.

सिंग आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अटारी-वाघा सीमेवरून पाकच्या करतारपूर साहिबला आले होते.
सिंग आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अटारी-वाघा सीमेवरून पाकच्या करतारपूर साहिबला आले होते.

वडिलांचे मित्र पाकला आल्यानंतर समजली कुटुंबाची माहिती

कुलसूम यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचे एक मित्र सरदार दारा सिंग भारतातून पाकला आले होते. मी त्यांची भेट घेतली. आईने त्यांना भारतात हरवलेल्या आपला मुलगा व मुलीची माहिती दिली. तसेच आपल्या गावचा पत्ताही दिला. पाकहून मायदेशी परतल्यानंतर सरदार दारा सिंग यांनी जालंधरच्या पडावां गावात जाऊन त्यांच्या घराला भेट दिली. तसेच बेपत्ता मुलांची माहिती काढली.

त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की, त्यांच्या मुलीचे निधन झाले आहे. पण त्यांचा मुलगा जिवंत असून, एका शिख कुटुंबासोबत राहतो.

यंदा पाकच्या फैसलाबादेत राहणारे मोहम्मद सादीक व भारतातून करतारपूर साहिबला गेलेले मोहम्मद हबीब आका उर्फ शैला यांची 75 वर्षांनंतर करतारपूरमध्ये भेट झाली. या भेटीमुळे सर्वजण भावूक झाले.
यंदा पाकच्या फैसलाबादेत राहणारे मोहम्मद सादीक व भारतातून करतारपूर साहिबला गेलेले मोहम्मद हबीब आका उर्फ शैला यांची 75 वर्षांनंतर करतारपूरमध्ये भेट झाली. या भेटीमुळे सर्वजण भावूक झाले.

मुस्लिमचे शिख बनले अमरजित सिंग

दारा सिंग यांनी सांगितले - त्यांच्या मुलाचे नाव अमरजित सिंग आहे. त्याला 1947 साली एका शिख कुटुंबाने दत्तक घेतले होते. भावाची माहिती मिळताच कुलसूम यांनी अमरजित यांच्याशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. तसेच एकमेकांची भेट घेण्याचा निश्चय केला. दुसरीकडे, अमरजित सिंग यांना जेव्हा आपले कुटुंबीय पाकिस्तानात जिवंत असल्याचे कळले, तेव्हा त्यांच्याही आनंदाला पारावार उरला नाही. त्यांची कायम आपल्या सख्ख्या बहिण-भावाची भेटण्याची इच्छा होती.

होशियारपूरच्या सुनीता देवी यांनी कुटुंबासोबत करतारपूरला जाऊन आपल्या नातेवाईकांची 43 वर्षांनंतर भेट घेतली होती. फाळणीवेळी सुनीताचे वडील भारतात राहिले, तर उर्वरित सदस्य पाकमध्ये गेले होते.
होशियारपूरच्या सुनीता देवी यांनी कुटुंबासोबत करतारपूरला जाऊन आपल्या नातेवाईकांची 43 वर्षांनंतर भेट घेतली होती. फाळणीवेळी सुनीताचे वडील भारतात राहिले, तर उर्वरित सदस्य पाकमध्ये गेले होते.

दोन्ही बहिण-भावांच्या भावना अनावर

सिंग आपल्या बहिणीला भेटण्यासाठी अटारी-वाघा सीमेवरून पाक स्थित करतारपूर साहिबला पोहोचले. तर कुलसूम आपला मुलगा शहजाद अहमद व कुटुंबातील इतर सदस्यांसमवेत फैसलाबादहून आल्या होत्या. या बहिण-भावाच्या अश्रूंचा बांध एकमेकांना पाहताच फुटला.

अमरजित सिंग यांनी सांगितले की, मी माझ्या कुटुंबासह काही काळ राहण्यासाठी पाकला जाईल. त्यानंतर त्यांनाही माझ्या कुटुंबाची भेट घडवून आणण्यासाठी आरतात आणेल. दोन्ही बहिण-भावाने एकमेकांसाठी अनेक भेटवस्तू आणल्या होत्या.

उल्लेखनीय बाब म्हणजे करतारपूर कॉरिडोरच्या माध्यमातून फाळणीवेळी एकमेकांपासून दूर गेलेल्या कुटुंबीयाची भेट होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी मे महिन्यात एका शिख कुटुंबात जन्मलेल्या महिलेची करतारपूरमध्ये आपल्या भारतीय भावांची भेट झाली होती. या महिलेची एका मुस्लिम दाम्पत्याने पालन पोषण केले होते.

बातम्या आणखी आहेत...