आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Brother in law Dies While Dancing At Sister in law's Wedding, Latest News And Update

मेहुणीच्या लग्नात नाचताना मेहुण्याचा मृत्यू, VIDEO:सरकारी शाळेत फिजिकल ट्रेनर होते, हार्ट अटॅकने अवघ्या 5 सेकंदांत मृत्यू

पाली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या पालीमध्ये मेहुणीच्या लग्नात आनंदाने नाचणाऱ्या मेहुण्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे लग्नाचा आनंद साजरा करणाऱ्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली. शहरातील महात्मा गांधी कॉलनीत शुक्रवारी रात्री ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला.

पालीच्या राणावास स्थानकालगत राहणारे 42 वर्षीय अब्दुल सलीम पठाण एका सरकारी शाळेत पीटीआय म्हणजे फिजिकल ट्रेनिंग इस्ट्रक्टर होते. ते आपली पत्नी व 2 मुलांसह सासरी भैरुघाट पिंजारोच्या बास येथे आले होते. शनिवारी त्यांच्या मेहुणीचे लग्न होते. शुक्रवारी रात्री घरात महिला संगीत रजनी सुरू होती.

अब्दुल सलीमही नातेवाईकांसोबत डान्स करत होते. डान्स करताना ते अचानक स्टेजवर कोसळले. नातेवाईकांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या शरीरात कोणतीही हालचाल नव्हती. त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरानी त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले. पण खरे कारण शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

अशा बहुतांश प्रकरणांत 3 कारणांनी मृत्यू होतो

अशा प्रकरणांत मृत्यू होण्याचे कार्डियक अरेस्ट, हार्ट अटॅक, हार्ट फेलियर हे 3 प्रमुख कारण असतात. चला याविषयी जाणून घेऊया.

हार्टमध्ये का होते इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट?

हृदयात कंडक्शन सिस्टम असते. त्यात इलेक्ट्रिकल करंट एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी फ्लो करते. यामुळे हृदय आंकुचन पावते व नॉर्मल सीक्वेंसमध्ये हार्ट बीट करते. सामान्य स्थितीत हृदय एका मिनिटात 72 वेळा धडकते. पण हा रेट जेव्हा 200 ते 250 किंवा 300 बीट प्रति मिनिट होते, तेव्हा हृदयाला रक्त चांगल्या प्रकारे पंप करता येत नाही. परिणामी, मेंदूला रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.