आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबंगळुरुमध्ये एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. तीन महिला आणि चार पुरुषांनी मिळून ही हत्या केली आहे. माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सीटीव्हीमध्ये दिसते की, युवक आणि आरोपींमध्ये वाद सुरू आहे. आचानक वाद वाढत गेला. यावेळी युवकाला जमीनीवर पाडून आरोपींनी दगड व विटांनी मारण्यास सुरवात केली. यावेळी पीडित तरुणाच्या किंकाळ्या ऐकून लोक जमला झाले. पण, तोपर्यंत आरोपी फरार झाले.
त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पीडितेला रुग्णालयात नेण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुण हा बदामी येथील रहिवासी आहे. आतापर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. प्रकरणाचा तपास सुरू आहे. दररोज घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
एका दिवसाच्या चिमुकलीला रस्त्यावर फेकले
एक दिवसाची बालिका ‘नकोशी’ झालेल्या क्रूर जन्मदात्यांनी जन्माला येऊन काही तासच झालेल्या पोटच्या चिमुरडीला पिशवीत कोंबून तिला रस्त्याच्या कडेला कचऱ्यासारखे फेकून दिले. काही वेळातच या चिमुकलीचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडल्याने अतिरक्तस्राव होऊन उपचारापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतला. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
चित्रपट निर्मात्याने पत्नीला कारने चिरडले
'खली बाली', 'देहाती डिस्को' या चित्रपटांचा निर्माता कमल किशोर मिश्रा याने त्याची पत्नी आणि अभिनेत्री यास्मिनला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी मुंबईत अंबाला पोलिस स्टेशनमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मिश्रा याच्याविरोधात कलम 279 आणि 338 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.