आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षेत चूक:भटिंडा लष्करी छावणीत सुरक्षेत गडबड; चोरलेल्या रायफलीतून 4 जवानांची झोपेतच गोळ्या घालून निर्घृण हत्या

भटिंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील सर्वात मोठ्या लष्करी छावण्यांपैकी एक भटिंडा छावणीत बुधवारी पहाटे ४.३० वाजता झालेल्या हल्ल्यात ४ जवानांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच छावणीतून चोरी झालेली इन्सास रायफल घेऊन मास्क घातलेल्या दोन हल्लेखोरांनी आर्टिलरी युनिटचे जवान झोपलेले असताना त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ला झाला तेव्हा लष्करी छावणीत जवान विनाशस्त्र तैनात होते. इन्सास रायफल, कुऱ्हाड बाळगलेले व कुर्ता-पायजामा घातलेले हल्लेखोर नंतर जंगलात फरार झाले. लष्कर आणि पंजाब पोलिसांनी सांगितले की हा दहशतवादी हल्ला नव्हता. पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. लष्कराच्या छावणीतून एक रायफल आणि २८ काडतुसे चोरीला गेल्याचा गुन्हा मंगळवारी दाखल केला होता. मृत जवानांमध्ये सागर बाणे (२५), कमलेश आर (२४), योगेशकुमार जे (२४) आणि संतोष नागराल (२५) यांचा समावेश आहे. ते कर्नाटक व तामिळनाडूचे रहिवासी आहेत.