आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

बीएस-4 रजिस्ट्रेशन:31 मार्चनंतर विकलेल्या बीएस-4 वाहनांचे रजिस्ट्रेशन होणार नाही- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

सुप्रीम कोर्टाने बुधवारी सांगितले की, 31 मार्चनंतर विक्री झालेल्या बीएस-4 वाहनांचे रजिस्ट्रेशन होणार नाही. सुप्रीम कोर्टाने आपल्या त्या आदेशाला परत घेतले आहे, ज्यात त्यांनी लॉकडाउन संपल्यानंतर 10 दिवसापर्यंत दिल्ली आणि एनसीआरसोडून देशातील इतर भागात बीएस-4  गाड्यांच्या विक्रीची परवानगी दिली होती.

जस्टिस एस. अब्दुल नजीर आणि जस्टिस इंदिरा बनर्जींसह जस्टिस अरुण मिश्रांच्या अध्यक्षतेखालील बेंचने नाराजी व्यक्त करत म्हटले की, ऑटोमोबाइल डीलर्सने आमच्या निर्देशांचे उल्लंघन केले. 31 मार्चनंतरही बीएस-4 वाहनांची विक्री करण्यात आली. 

'वाहनांना ऑनलाइन 3% ते 40% सवलतींवर विकण्यात आले'

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन ऑफ इंडिया (एफएडीए)च्या वकीलांनी बेंचला म्हटले की, कोर्टाने बीएस-4 वाहनांच्या 31 मार्चपूर्वीच विक्रीचे आदेश दिले होते. याकाळात रजिस्ट्रेशन करण्यात आले. यावर न्यायालयाने म्हटले की, लॉकडाउनमध्येही डीलर्सनी वाहनांची विक्री कशी काय केली? 17 हजारांपेक्षा जास्त वाहनांची माहिती ई-वाहन पोर्टलवर अपलोड केलीच नाही, असेही कोर्टाने सांगितले.

23 जुलैनंतर या प्रकरणाची सुनानवी होईल

जस्टिस मिश्रांच्या बेंचने केंद्राला 31 मार्चला वाहन पोर्टल पोस्टवर अपलोड केलेल्या वाहनं आणि याच्या तारखेच्या 15 दिवसांपूर्वीचा डेटा अपलोड करण्यास सांगितले होते. कनिष्ठ न्यायालयाने एफएडीएला सरकारला विकलेल्या वाहनांचा डेटा देण्यासही सांगितले होते. बेंच आता 23 जुलैला याप्रकरणी सुनावनी करेल.

Advertisement
0