आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑटोमोबाइल कंपन्या १ एप्रिलपासून बीएस 6-II उत्सर्जन मानकांनुसारच गाड्यांची निर्मिती करतील. यामुळे कारच्या किमती १५-५० हजारांपर्यंत वाढतील. एंट्री लेव्हलच्या दुचाकी १०%, व्यावसायिक वाहने ५% पर्यंत महागण्याची शक्यता आहे.
ऑटोमोबाइल तज्ज्ञ संजीव गर्ग यांच्या मते, ही वाढ मॉडेल व इंजिन क्षमतेवर अवलंबून असेल. यापूर्वी १ एप्रिल २०२० रोजी बीएस 6-I मानक लागू होतेवेळी कार ५०-९० हजारांपर्यंत महागल्या होत्या. बीएस 6-II मानक ‘रिअल ड्रायव्हिंग एमिशन्स’ (आरडीई) या नावानेही ओळखले जाते. यात उत्सर्जनाची रिअल टाइम मॉनिटरिंग होईल. नवी मानके भारतीय बाजारात मिळणाऱ्या गाड्यांना युरो ६ स्टेजच्या मानकांच्या बरोबरीने उभ्या करतील. ऑटोमोबाइल कंपन्या जुनी मानके म्हणजेच 6-I च्या हिशेबाने गाड्यांची निर्मिती करू शकणार नाहीत. मात्र, आधीपासूनच तयार असलेला गाड्यांचा स्टॉक संपेपर्यंत कंपन्या त्या विकू शकतील.
अनेक मॉडेल्सचे उत्पादन बंद होईल
गर्ग म्हणाले, बीएस 6-II मानक लागू झाल्याने छोट्या कार, खास करून डिझेल इंजिन कारच्या किमती सर्वाधिक वाढतील. १.५ लिटरपर्यंतच्या छोट्या इंजिनच्या कारसाठी हे लागू करणे कठीण असेल. अशा वेळी १ एप्रिलपासून अनेक मॉडेल्सचे उत्पादन बंद होईल. यामध्ये होंडा सिटी ४ जनरेशन, अमेझ (डिझेल), ह्युंदाई आय२० (डिझेल), वरना (डिझेल), मारुती सुझुकी अल्टो ८००, टाटा अल्ट्रोज (डिझेल), महिंद्रा मराजो आणि स्कोडा ऑक्टॅव्हिया आदी कारचा समावेश आहे.
कंपन्यांना गाड्यांमध्ये हे बदल करावे लागतील
{ गाडी चालवताना एमिशन लेव्हल सांगणारी उपकरणे बीएस 6-II गाड्यांत लावावी लागतील.
{ कारच्या कॅटेलिक कन्व्हर्टर आणि ऑक्सिजन सेन्सर्समध्ये लावण्यात येणारी रिअल टाइम माॅनिटरिंग सिस्टिम एमिशन लेव्हल वाढल्यास इशारा देईल.
{ कंपन्यांना कारच्या हार्डवेअर, सॉफ्टवेअरमध्ये बदल करावे लागतील. त्यात सेमी कंडक्टर्स अपग्रेडचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.