आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bs Yediyurappa Helicopter Landing Controversy; Difficulty In Landing Kalaburagi | Bs Yediyurappa

हवेत घिरट्या मारत राहिले येदियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर:प्लास्टिक पत्रे आणि कचऱ्यामुळे कलबुर्गीत लँडिंगमध्ये अडचण; मैदान स्वच्छ करुन अर्ध्या तासानंतर उतरले

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते येदियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगच्या ठिकाणी निष्काळजीपणा झाल्याचे दिसून आले आहे. हेलिपॅडचे मैदान प्लास्टिक पत्रे आणि कचऱ्याने भरल्याने हेलिकॉप्टरची लँडिंग होऊ शकली नाही. त्यामुळे काही वेळ येदियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर हवेत चक्कर मारत राहिले.

येदियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर उतरताना अडचण, हेलिपॅड मैदान कचऱ्याने भरले होते.
येदियुरप्पा यांचे हेलिकॉप्टर उतरताना अडचण, हेलिपॅड मैदान कचऱ्याने भरले होते.

माजी मुख्यमंत्री विजय संकल्प यात्रेत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ही संपूर्ण घटना घडली. येदियुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरच्या लँडिंगची व्यवस्था कलबुर्गी येथील जेवरगी येथे करण्यात आली होती. हेलिकॉप्टरच्या रोटरच्या दाबाने कपडे आणि प्लास्टिकच्या पिशव्या उडू लागल्या. अशा परिस्थितीत पायलटला हेलिकॉप्टर उतरवणे कठीण झाले. त्यामुळे हेलिकॉप्टरचे लँडिंग पुढे ढकलण्यात आले आणि लँडिंगची जागा साफ केल्यानंतर हेलिकॉप्टर उतरवण्यात आले. ही बाब प्रोटोकॉलचे उल्लंघन मानली जात असून अधिकारी चौकशीचे आदेश देऊ शकतात.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने ज्येष्ठ नेते बी. एस. येदियुरप्पा यांच्यावरच निवडणुकीची धुरा सोपविली आहे. येदियुरप्पा यांनी चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. भाजपला तळागाळात पोहोचविण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांचा जनतेशी 'कनेक्ट' असून, प्रामुख्याने राजकीयदृष्ट्या प्रभावी असलेल्या लिंगायत समाजाचे ते प्रतिनिधित्व करतात.

दरम्यान, कर्नाटकमध्ये सध्या बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्त्वात भाजपचं सरकार असून काँग्रेसने देखील निवडणुकांची जोरदार तयारी केली आहे.

कर्नाटकात 100 विधानसभा जागांवर लिंगायतांचा प्रभाव

कर्नाटकात लिंगायत समाज सुमारे 17% आहे. राज्यातील जवळपास निम्म्या लोकसंख्येवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. अशा स्थितीत येदियुरप्पा यांच्याकडे दुर्लक्ष करणे भाजपला सोपे जाणार नाही. असे करणे म्हणजे या समाजाची मते गमावणे होय.

येदियुरप्पा दूरावल्याने 2009 मध्ये भाजपचा पराभव

2009 मध्ये जेडीएसने भाजपला, विशेषत: येदियुरप्पा यांना अडीच वर्षांच्या सीएम फॉर्म्युल्यात पाठिंबा दिला नव्हता आणि सरकार पडले होते. त्यानंतर सहानुभूतीचा घटक येदियुरप्पा यांच्या बाजूने गेला आणि भाजपने निवडणूक जिंकली. यानंतर येदियुरप्पा भाजपपासून वेगळे झाले आणि भाजपचा निवडणुकीत पराभव झाला होता.

येडियुरप्पांचा दावा- कर्नाटकात भाजप 130-140 जागा जिंकेल

कर्नाटकात भाजपला सत्तेत येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. आम्ही किमान 130-140 जागा जिंकू, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बीएस येदियुरप्पा यांनी केला. तर काँग्रेसमध्ये 'मैं हूं मुख्यमंत्री'वरून वाद सुरू झाला आहे. काँग्रेसचा नेता कोण? राहुल गांधी का? असा सवालही त्यांनी केला. येथे वाचा संपुर्ण बातमी.

मोदी-शहांचा गुजरात फॉर्म्युला कर्नाटकातही : BJP 30% आमदारांची तिकिटे कापणार

भाजपने ज्या फॉर्म्युलावर गुजरातेत 156 जागा जिंकल्या, पक्ष आता तोच फॉर्म्युला कर्नाटकातही वापरणार आहे. यानुसार 30 टक्के आमदारांची तिकिटे कापली जातील. तिकिट त्यांची कापली जातील, ज्यांचा सर्व्हेत रिपोर्ट नकारात्मक आला आहे. इथे गुजरातप्रमाणे मुख्यमंत्री बदलले जात नाही, कारण आता निवडणुकीला तीनच महिने उरले आहेत. हे निश्चित आहे की भाजपने विजयासह पुन्हा सत्ता मिळवली तर बसवराज बोम्मई पुन्हा मुख्यमंत्री बनणार नाही. - येथे वाचा सविस्तर बातमी

बातम्या आणखी आहेत...