आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BS Yediyurappa Resignation; Karnataka News | Karnataka CM Yediyurappa Submitted Resignation To Prime Minister Modi; News And Live Updates

कर्नाटकात राजकीय हालचाली:मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी घेतली नड्डा यांची भेट, गृहमंत्र्यांनाही भेटणार; राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले - यात काही तथ्य नाही

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटकात सत्ता आणण्यासाठी काम करणार - येडियुरप्पा

पंतप्रधान मोदी यांच्या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे. त्यानंतर ते गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेणार आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा लवकरात लवकर राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांचे वाढते वय आणि इतर आरोग्याशी संबंधित समस्येमुळे राजीनामा देणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, यावर खुलासा करत यामध्ये काही तथ्य नसल्याचे येडियुरप्पा यांनी सांगितले आहे. शुक्रवारी मी पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासाबद्दल सविस्तरपणे चर्चा केली. पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात मी पुन्हा दिल्लीला जाणार असल्याचे ते म्हणाले.

कर्नाटकात सत्ता आणण्यासाठी काम करणार - येडियुरप्पा
नड्डा यांची भेट घेतल्यानंतर ते म्हणाले की, "आम्ही देशात व राज्यात पक्षाचा विकास कसा करायचा आणि कर्नाटकातील पक्षाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी आम्ही सविस्तर चर्चा केली. माझ्याबद्दल त्यांचे चांगले मत असून मी राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी काम करेन."

बातम्या आणखी आहेत...