आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BS Yediyurappa Resignation; Karnataka News | Who Will Next Chief Minister Of Karnataka; News And Live Updates

कर्नाटक मुख्यमंत्र्यांचा राजीनामा:संधी दिल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे मानले आभार; म्हणाले - मी नेहमीच कठीण संकटातून गेलो आहे

बंगळूरु2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 जुलै रोजी अचानक पंतप्रधान मोदींना भेटायला पोहोचले होते

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे राज्यात आजच या सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान, या कार्यक्रमात मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा करत आपण नेहमीच कठीण संकटातून गेलो असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राजभवनात पोहोचल्यानंतर आपला राजीनामा राज्यपालांना सादर केला. राज्यपालांनीदेखील त्यांचा राजीनामा मान्य केला आहे. तथापि, नवीन मुख्यमंत्री जाहीर होईपर्यंत ते कार्यवाहक मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील.

राजीनाम्यानंतर ते म्हणाले की, मी स्वत: राजीनामा दिला असून माझ्यावर उच्च कमांडकडून कोणताही दबाव येत नाहीये. राज्यात आपला पक्ष मजबूत करण्यासाठी मी सदैव काम करेन असे ते यावेळी म्हणाले. मला कर्नाटकातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानतो असे ते म्हणाले.

लिंगायत समुदायावर मजबूत पकड
मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांचा लिंगायत समुदायावर मजबूत पकड आहे. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपसमोर सर्वात मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे. गेल्या दिवशी लिंगायत समाजातील विविध मठातील 100 पेक्षा जास्त संतानी येडियुरप्पा यांची भेट घेत पाठिंबा दर्शविला होता. त्यासोबतच त्यांना पदावर काढून टाकल्यास याचे गंभीर परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारादेखील या संतानी यावेळी दिला होता.

कर्नाटकातील 100 जास्त विधानसभा जागेवर लिंगायत समाजाचा प्रभाव
कर्नाटक राज्यात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणावर असून 17 टक्के आहे. राज्यातील 224 विधानसभा जागेतील 90 ते 100 जांगावर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. विशेष म्हणजे राज्यातील अर्ध्यापेक्षा जास्त समुदायांवर लिंगायत समाजाचा प्रभाव आहे. यामुळे भाजपला मोठे आव्हान या समाजाचे असणार आहे.

16 जुलै रोजी अचानक पंतप्रधान मोदींना भेटायला पोहोचले होते
यापूर्वी येडियुरप्पा 16 जुलैला दिल्लीला पोहोचले होते आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. अचानक झालेल्या बैठकीमुळे येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याविषयीच्या चर्चांना बळ मिळाले होते. यानंतर त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

येदियुरप्पांच्या राजीनाम्याच्या चर्चा का?

  • येदियुरप्पांचे वय आणि बिघडलेली तब्येत.
  • कर्नाटकातील वर येत असलेले नेते आणि जुने संघी बी एल संतोष यांची येदियुरप्पांविषयी नाराजी.
  • येदियुरप्पांच्या कॅम्पमध्ये सक्रिय खासदार शोभा करंदलाजे यांचे मोदी कॅबिनेमध्ये सामिल होणे.
बातम्या आणखी आहेत...