आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगालचा संघर्ष:बीएसएफचे जवान मतदारांना धमकवताहेत; तृणमूलची तक्रार

काेलकाता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तृणमूल, भाजप नेत्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) पश्चिम बंगालमध्ये राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आराेप तृणमूल काँग्रेसने केला आहे. जवान सीमेवरील भागातील मतदारांना धमकावू लागले आहेत, असे तृणमूलचे म्हणणे आहे. तृणमूलच्या शिष्टमंडळाने गुरुवारी निवडणूक आयाेगाच्या पूर्ण पीठासमक्ष हजर राहून बीएसएफविराेधात तक्रार केली आहे. बीएसएफचे जवान विशिष्ट पक्षाच्या बाजूने मतदान करण्यासाठी दबाव टाकत आहेत. शिष्टमंडळाच्या या भेटीनंतर तृणमूलचे सरचिटणीस पार्था चटर्जी प्रसारमाध्यमांना म्हणाले, अशा प्रकारे धमकावणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आम्ही िनवडणूक आयाेगाकडे तक्रार दाखल केली आहे. आता आयाेगाने कारवाई करायला हवी. राज्य विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयाेगाचे प्रतिनिधी पश्चिम बंगालच्या दाैऱ्यावर आहेत. बीएसएफने मात्र तृणमूलच्या आराेपांना फेटाळून लावले आहे. बीएसएफचा राजकारणाशी काही एक संबंध नाही. बीएसएफ ही अराजकीय व्यवस्था असल्याचे बीएसएफने आराेपाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे.

‘गाेळी घाला..’ घाेषणेप्रकरणी भाजपचे तिघे अटकेत
चंदननगर । पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. अटक झालेल्यांमध्ये हुगळी जिल्हाध्यक्ष सुरेश साहू यांचा समावेश आहे. या लाेकांना ‘गाेळी घाला...’ अशी घाेषणाबाजी केल्या प्रकरणात पाेलिसांनी ही कारवाई केली. राज्याच्या पाेलिसांनी स्वत:हून त्याची दखल घेतली.

सुभाषचंद्र बाेस यांच्या जयंतीनिमित्त माेदींची बंगाल भेट
पंतप्रधान नरेंद्र माेदी २३ जानेवारीला बंगाल व आसामच्या दाैऱ्यावर जातील. ते बंगालमध्ये सुभाषचंद्र बाेस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयाेजित ‘पराक्रम दिन’संबंधी विविध कार्यक्रमांत मार्गदर्शन करतील. याच दिवशी आसामच्या शिवसागरमधील एका कार्यक्रमात भूखंड मालकी हस्तांतरण केले जाणार आहे. त्यामुळे त्यांचा हा दाैरा महत्त्वाचा मानला जाताे. कारण एप्रिल-मेमध्ये दाेन्ही राज्यांत विधानसभा निवडणूक हाेणार आहे.

फुरफुरा शरीफच्या दर्गाप्रमुखांचा नवा पक्ष
बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर फुरफुरा शरीफ दर्गाप्रमुख अब्बास सिद्दिकी यांनी ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’(आयएसएफ) या नव्या पक्षाची स्थापना केली आहे.. आमचा पक्षा तेलंगणाचे नेते असदुद्दीन आेवेसी यांच्या एमआयएमसाेबत राज्यात २९४ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

बातम्या आणखी आहेत...