आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक सीमा वाद:बीएसएफने जप्त केल्या पाक मच्छीमारांच्या नौका

अहमदाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) गुरुवारी गुजरातच्या कच्छ भागात भारत-पाक सीमेवर मासे पकडणाऱ्या दोन पाकिस्तानी नौका जप्त केल्या. बीएसएफकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरामी नाला क्रीक क्षेत्रात प्रवेश करणारे पाकिस्तानी मच्छीमार बीएसएफच्या पथकाला पाहिल्यानंतर आपल्या नौका सोडून पळाले.

या नौकांमध्ये मासे पकडण्याची काही उपकरणे व जाळे आढळले, पण कोणतीच संशयित सामग्री त्यात नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीने भारतीय मच्छीमारांना या ठिकाणी प्रवेश दिला जात नाही. तर पाकिस्तानचे मच्छीमार नेहमीच मासे पकडण्यासाठी या भागात प्रवेश करतात.

बातम्या आणखी आहेत...