आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानकडून दिवसेंदिवस भारतावर करण्यात येणाऱ्या कुरघोड्या वाढतानाच दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर ड्रोनची घुसखोरी थांबण्याचे नाव काही घेण्यात येत नाही. यामुळे सीमेवरील सुरक्षेसाठी BSFकडून स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. हे तंत्रज्ञान मेक इन इंडिया अंतर्गत तयार करण्यात आले आहे. पाकिस्तानातून येणारे धोकादायक ड्रोन पाडण्यासाठीही स्वदेशी तंत्राचा वापर केला जात आहे. बीएसएफचे डीजी पंकज सिंह यांनी ही माहिती दिली. सीमेपलीकडून येणारे ड्रोन हे एक मोठे आव्हान असल्याचे त्यांनी म्हटले.
आकाशातून येणारा धोका हा मोठा
डीजी पंकज सिंह म्हणाले की, आकाशातून येणारा हा नवीन धोका एक मोठा मुद्दा बनला आहे. सीमेवर अँटी-ड्रोन तंत्रज्ञान स्थापित केले असले तरी आपल्याकडे संपूर्ण पश्चिम क्षेत्र व्यापणारा मेगा सेटअप नाही. या दिशेने आम्ही अनेक भारतीय कंपन्यांशी चर्चा करत आहोत. येत्या काही दिवसांत आम्ही हे नवीन तंत्रज्ञान आणखी अनेक संवेदनशील भागात तैनात करू शकतो.
बीएसएफने ड्रोन देखील विकसित केले आहेत. जे अचूकतेने अश्रुवायूचे शेल डागू शकतात. डीजी म्हणाले की, आमच्या टेकनपूर येथील टीयर गॅस युनिटने अशा प्रकारचे ड्रोन विकसित केले आहेत. जे एका वेळी केवळ 5 ते 6 अश्रुवायूचे गोळे वाहून नेऊ शकत नाहीत. तर हे गोळे अचूकपणे लक्ष्यावर सोडू शकतात. तथापि, आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ विकसित केले गेले आहे आणि प्रत्यक्षात आणले गेले नाही.
2022 मध्ये 16 ड्रोन पाडले
बीएसएफच्या म्हणण्यानुसार, यावर्षी आतापर्यंत 16 ड्रोन पाडण्यात आले आहेत. यातील बहुतांश चीन बनावटीचे आहेत. पंकज सिंह म्हणाले की, ड्रोनमध्ये इनबिल्ट चिप्स असतात. त्यामुळे आम्ही काही प्रकरणांमध्ये डेटा पुनर्प्राप्त करण्यास सक्षम आहोत. डीजीच्या म्हणण्यानुसार, बीएसएफ आता अधिकाधिक स्वदेशी तंत्रज्ञानाची निवड करत आहे. कारण पाळत ठेवण्यासाठी वापरले जाणारे परदेशी तंत्रज्ञान खूप महाग होते.
ते म्हणाले की, बीएसएफने स्वतःची यंत्रणा विकसित करण्याचा आग्रह धरला आहे. आम्ही आमच्या टीमच्या मदतीने कमी किमतीची तंत्रज्ञान प्रणाली विकसित केली आहे. गृह मंत्रालयाने या मुद्द्यासाठी 30 कोटी रुपये मंजूर केल्याचे डीजी यांनी सांगतिले. तसेच सीमेवर 5500 कॅमेरे बसवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सीमेवरील गावांचींही ड्रोनवर नजर
पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनवरही सीमावर्ती गावातील लोक आता लक्ष ठेवतील. यावर्षी जुलैमध्ये ड्रोनबाबत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून ड्रोनच्या दैनंदिन हालचाली आणि हेरॉइन आणि शस्त्रास्त्रांच्या सततच्या खेपानंतर आता सीमा सुरक्षा दलाने संपूर्ण परिसरात 1 लाखाचे बक्षीस देणारे पोस्टर्स लावले आहेत. येथे वाचा पुर्ण बातमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.