आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BSF Shoots Down Pakistani Drone Flying 250 Meters Inside The Indian Border In Kathua, Jammu And Kashmir

पाकिस्तानचे ड्रोन पाडले:जम्मू-काश्मीरात पाकिस्तानचे सशस्त्र ड्रोन हाणून पाडले, भारतीय सीमेच्या 250 मीटर आत करत होता रेकी

कठुआ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी ड्रोनला शस्त्र देखील बांधले होते

चीनसोबत भारताचा वाद सुरू असतानाच पाकिस्तानच्या कुरापती वाढल्याचे दिसून येत आहे. जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ येथे पाकिस्तानचे एक ड्रोन हाणून पाडण्यात आले आहे. बीएसएफने शूट केलेल्या ड्रोनमध्ये शस्त्र देखील लावले होते. हे ड्रोन भारतीय सीमेच्या 250 मीटर आतमध्ये येऊन हेरगिरी करत होते. आधी भारतीय सैनिकांवर चिनी सैनिकांनी हल्ला केला. त्यावेळी सुद्धा पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी रात्री उच्चस्तरीय बैठक घेतली होती. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 5 वाजून 10 मिनिटाला बीएसएफच्या पेट्रोलिंग पार्टीला हे ड्रोन दिसून आले. हे ड्रोन भाकतीय हद्दीच्या 250 मीटर आतमध्ये उडत होते. बीएसएफने यानंतर ड्रोनला लक्ष्य करून 9 राउंड फायरिंग केली. तसेच ड्रोन त्याच ठिकाणी हाणून पाडले. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहेत.

भारत आणि चीनमध्ये वाद सुरू झाला तेव्हापासून पाकिस्तानच्या कुरापती आणखी वाढल्याचे गेल्या काही दिवसांत दिसून आले आहे. याच दरम्यान पाकिस्तानने शनिवारी सकाळी 8 वाजून 50 मिनिटाला सीमेवर फायरिंग सुद्धा केली. जम्मू-काश्मीरच्या हीरानगर सेक्टरच्या बबिया पोस्टवर पाकिस्तानने काही राउंड फायरिंग केली. यास बीएसएफने उत्तर दिले नाही. वरिष्ठ अधिकारी सध्या परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

0