आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BSF Troops Fired At A Small Hexacopter Belonging To Pakistan In Arnia Sector Jammu

ड्रोनची पाकिस्तान लिंक:​​​​​​​इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायुक्तालयावरही दिसले ड्रोन, सुरक्षेतील चुकीवर भारताने घेतला तीव्र आक्षेप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार लवकरच काउंटर ड्रोन पॉलिसी आणेल

जम्मूमध्ये सतत ड्रोन दिसत असल्याच्या घटना समोर येत आहेत. जम्मू-काश्मीरच्या आर्निया सेक्टरमध्ये पुन्हा ड्रोन दिसला आहे. पहाटे 4.25 वाजता हा पाकिस्तानी ड्रोन आंतरराष्ट्रीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. पण बीएसएफच्या गोळीबारानंतर तो परतवण्यात आला. बीएसएफचे म्हणणे आहे की ते सीमेवर पाळत ठेवण्यासाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयावरही ड्रोन दृष्टीस पडला. भारताने त्यास सुरक्षेतील मोठी चूक असल्याचे म्हटले आहे आणि आक्षेपही घेतला आहे.

जम्मूबद्दल बोलायचे झाले तर येथे 7 दिवसांत चौथी ड्रोन अॅक्टिव्हिटी घडली आहे. शनिवारी रात्री जम्मू एअरबेसवर ड्रोनने पहिला दहशतवादी हल्ला झाला होता. यात हवाई दलाच्या दोन जवानांना किरकोळ जखम झाली असून इमारतीच्या छतालाही नुकसान झाले. यानंतर रविवारी रात्री जम्मूमधील कालूचक मिलिटरी तळावरही हे ड्रोन दिसले. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा सुजवान मिलिटरी स्टेशनजवळ एक संशयास्पद ड्रोन दिसला.

सरकार लवकरच काउंटर ड्रोन पॉलिसी आणेल
सलग सुरू असलेल्या ड्रोन कारवायानंतर सरकार सतर्क झाले असून काउंटर ड्रोन पॉलिसी बनवण्याचे काम सुरू केले आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संपूर्ण बैठकीत संपूर्ण जम्मू आणि पंजाब विभागात काउंटर ड्रोन सिस्टम कायमस्वरुपी तैनात करण्याची गरज यावर चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...