आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BSP Supremo Mayawati On Congress Choosing Dalit Leader For CM Post Latest News And Updates

काँग्रेसच्या दलित कार्डवर मायावती:राजकीय डावपेच म्हणूनच चन्नी यांना कमी वेळासाठी मुख्यमंत्री केले, दलितांनी काँग्रेसपासून सावध राहावे; पंजाबच्या राजकारणावर मायावतींचा हल्लाबोल

लखनऊ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमध्ये काँग्रेसने दलित नेत्याला मुख्यमंत्री पदी बसवणे म्हणजे हा केवळ एक राजकीय डावपेचचा भाग आहे अशी टीका बहुजन समाज पक्ष (बसप) सुप्रीमो मायावती यांनी केली. पत्रकारांशी संवाद साधून त्या बोलत होत्या. पंजाबमध्ये आगामी निवडणूक पाहता राजकीय हातखंडा म्हणून मुख्यमंत्री बदलण्यात आला आहे. त्यातही चरणजीत सिंग चन्नी यांना खूप कमी वेळासाठी मुख्यमंत्री करण्यात आले आहे. प्रत्यक्षात केवळ कठिण काळातच काँग्रेसला दलितांची आठवण येते असा टोला मायावतींनी लावला आहे.

काँग्रेसपासून सावधान

बसप अध्यक्ष मायावती यांनी चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर पुढे बोलताना म्हणाल्या, काँग्रेसने आजपर्यंत कधीही दलितांवर विश्वास ठेवलेला नाही. त्यांना कठीण काळातच दलितांची आठवण येते. त्यामुळे, कठिण काळात चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले आहे. पंजाबची निवडणूक काँग्रेस बिगर दलित चेहऱ्याला पुढे करूनच लढणार आहे. त्यामुळे, दलितांनी काँग्रेसपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

हा निवडणुकीचा हातखंडा - मायावती

पंजाबमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यात पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद दूर करण्यासाठी काँग्रेसने कॅप्टन अमरिंदर सिंग यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर चन्नी यांना बसवले. उल्लेखनीय बाब म्हणजे, मायावती पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलसोबत आघाडी करून मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत. अशात काँग्रेसने दलित नेत्याला मुख्यमंत्री करणे हा निवडणुकीचाच डावपेच असल्याची टीका बसप अध्यक्षांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...