आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलार सिटी:बुद्धांचे सांची आता ऊर्जा साक्षर शहर! याच महिन्यात मोदींच्या हस्ते लोकार्पण

भोपाळ | उपमिता वाजपेयीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
नागौरी डोंगरावर बसवलेले पॅनल ३ मेगावॅट वीज तयार करतात. फोटो: शान बहादूर - Divya Marathi
नागौरी डोंगरावर बसवलेले पॅनल ३ मेगावॅट वीज तयार करतात. फोटो: शान बहादूर

भोपाळपासून ५० किमी अंतरावरील जागतिक वारसास्थळ असलेल्या सांची नगरीला आता देशाच्या नकाशावर नवीन आेळख मिळणार आहे. संपूर्ण सांची शहर सौर विजेवर चालणार आहे. अशी व्यवस्था असलेले सांची देशातील पहिली सोलार सिटी ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण होईल. कर्करेषेवरील सांची शहरात सूर्याची थेट किरणे पडतात. उन्हाच्या या शक्तीचे आता ऊर्जेत रूपांतराची तयारी सुरू झाली. गौतम बुद्ध आणि सांची असे अतूट नाते असलेले हे शहर आणखी नैसर्गिक होत आहे.

कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीद्वारे (सीएसआर) एखादे शहर सोलार सिटी म्हणून विकसित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजेच या प्रकल्पात सरकारला एक रुपयाही खर्च करावा लागलेला नाही. निधीचा पुरवठा करणाऱ्या सर्व कंपन्या ऊर्जा सार्वजनिक मालकी क्षेत्रातील युनिट आहेत. सध्या वार्षिक ३० लाख युनिटची गरज असलेल्या सांचीत ५६ लाख युनिट वीजनिर्मितीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घरात एसी लावला, नवीन घरे बनली किंवा नवीन हॉटेल सुरू झाले तरीदेखील सोलार ग्रिड गरजेनुसार वीज देऊ शकेल. ही तयारी पुढील पाच वर्षांसाठी आहे. येथे मध्य प्रदेश पर्यटन विभागाच्या हॉटेलवर शहरातील सर्वात मोठा पॅनल (१०० केव्ही क्षमता) आहे. स्थानकावर ५० केव्ही व घर-कार्यालयांत २५ केव्हीचे पॅनल आहेत. ऑफ ग्रिड अर्थात इंडिव्हिज्युअल पॅनलच्या माध्यमातून काम करणारे ट्री, स्ट्रीट लाइट, हायमास्ट, विंड टर्बाइन, सोलार स्क्रीन, ऑडिआे-व्हिडिआे पॅनल, वॉटर कियोस्क, चार्जिंग पॉइंट असे एकाच शहरात पहिल्यांदाच लावले आहेत.

७ हजार लोकांना वीज बचत व प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र : हे मोठे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी १८०० कुटुंबांतील ७ हजार लोकांना वीज बचतीसाठी प्रशिक्षण व प्रमाणपत्र दिले जात आहेत. १२ वर्षांखालील व ६० वर्षांवरील वयस्कर वगळता सांचीतील प्रत्येक व्यक्तीला याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. कोणता बल्ब-ट्यूबलाइटचा वापर करावा, हे त्यांना शिकवले जात आहे. एसीची स्टार रेटिंग, तापमान किती राखावे..अशी छोटी-छोटी माहिती दिली जाते. सौर बाजारपेठेला गती मिळावी यासाठी १२ खासगी सौर कंपन्यांनी सांचीत आपली कार्यालये सुरू केले आहेत. कुटुंबांना सोलर कुकर, सोलर कंदीलही दिले जात आहेत.

७० हजार युनिट ऊर्जेची बचत : वीज बचत करण्यासाठी साक्षर झालेल्या या शहरात ७० हजार युनिट विजेची बचत व ६३ हजार किलो कार्बनचे उत्सर्जन घटले आहे. हे प्रमाण सुमारे २ लाख वृक्षलागवडी एवढे आहे. सध्या संपूर्ण शहर ३ मेगावॉट सौर विजेवर चालत आहे. परंतु तयारी ५ मेगावॉट विजेची आहे. त्यामुळे जवळील खेडी, शेतीलाही त्याचा लाभ मिळावा असा त्यामागील उद्देश आहे.

३५ कुटुंबांनी स्वखर्चाने पॅनलसाठी नोंदणी केली
रुग्णालयापासून रस्त्यांवरील ब्लिंकर्स, स्ट्रीट लाइट, रेल्वे स्थानकासह तीन सरकारी शाळांत सौरऊर्जेचा वापर केला जात आहे. २१ सरकारी कार्यालयांच्या छतावर सोलार ग्रिड लावले आहेत. त्याशिवाय ३५ कुटुंबांनी १.५ ते २ लाख खर्च करून सौर पॅनलसाठी नोंदणी केली आहे. ६ कुटुंबांना ग्रिडद्वारे वीज मिळत आहे. त्यांना ४४ हजारांचे अनुदान मिळते. त्यापैकीच धर्मेंद्र म्हणाले, पूर्वी महिन्याचे बिल ३ हजार होते. ते आता कमी होऊन ३००-४०० एवढेच येते.