आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Budget 2021 Announcement For West Bengal, Assam, Kerala Tamil Nadu Ahead Vidhan Sabha Election 2021

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेटमध्ये निवडणूक राज्ये आणि कोरोना:आसाम-बंगालमधील चहाच्या मळ्यातील कामगारांना 1000 कोटी मिळणार, लसीवर 35 हजार कोटी खर्च करण्याची घोषणा

नवी दिल्ली23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 2021 अर्थसंकल्पात 4 निवडणूक राज्ये, आरोग्य आणि शेतकरी

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. यावर्षी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. अर्थसंकल्पीय भाषणात सीतारमण यांनी या चारही राज्यांना संबोधण्याचा प्रयत्न केला. पश्चिम बंगाल आणि आसाममधील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणार्‍या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी एक हजार कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर केरळ आणि तमिळनाडूत महामार्गांसह मेट्रो उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी शेतकरी आंदोलन, कोरोना विषाणूमुळे देखील अर्थसंकल्पावर लक्ष होते. सरकारने कोरोना लसीसाठी निधी जाहीर केला आहे.

अर्थसंकल्पात 4 निवडणूक राज्ये, आरोग्य आणि शेतकरी

आसाम - पश्चिम बंगाल

 • दोन्ही राज्यांतील चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या महिला आणि त्यांच्या मुलांसाठी 1000 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
 • बंगालमध्ये 25 हजार कोटी रुपयांचे महामार्ग तयार होणार आहेत.कोलकाता-सिलीगुडी रस्त्याचे अपग्रेड होईल.
 • आसाममध्ये राष्ट्रीय महामार्गावर 34 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

केरळ-तमिळनाडू मध्ये मेट्रो आणि महामार्ग

 • कोची (केरळ) मेट्रोत 1900 कोटी रुपये खर्चुन 11 किमी भाग तयार केला जाईल.
 • चेन्नई (तमिळनाडू) मध्ये 63 हजार कोटींच्या खर्चाने 180 किमी लांब मेट्रो मार्ग उभारला जाईल.
 • तमिळनाडूत 3500 किमी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत 1.03 लाख कोटी रुपये खर्च केले जातील. याचे बांधकाम पुढील वर्षापासून सुरु होईल.
 • केरळमध्ये 1100 किमी राष्ट्रीय महामार्गाचे बांधले जातील. याअंतर्गत मुंबई-कन्याकुमारी कॉरिडोर देखील उभारले जाईल. केरळमध्ये यावर 65 हजार कोटी रुपये खर्च केले जातील.

आरोग्य : कोरोना लसीवर निधी निश्चित

 • कोरोना लसीवर 2021-22 मध्ये 35 हजार कोटी रुपये खर्च केले जातील. आवश्यक असल्यास अधिक निधी दिला जाईल.
 • पोषणाकडेही लक्ष दिले जाईल. मिशन पोषण 2.0 सुरु केले जाईल. पाणीपुरवठा वाढवला जाईल. 5 वर्षांत 2.87 लाख कोटी रुपये खर्च होतील.
 • शहरी भागासाठी जलजीवन अभियान सुरू केले जाईल. शहरी स्वच्छ भारत मोहिमेवर 5 वर्षांत 1.48 लाख कोटी रुपये खर्च केले जातील.
 • न्यूमोकोकल लस (न्यूमोनियासाठी) देशभरात सुरू केली जाईल. यामुळे दरवर्षी 50 हजार मुलांचे प्राण वाचतील.
 • 64 हजार 180 कोटी रुपयांच्या बजेटसह पंतप्रधान आत्मनिर्भर निरोगी भारत योजना सुरु होईल. हे बजेट नवीन आजारांच्या उपचारासाठीदेखील असेल.
 • यामुळे 70 हजार गावांमधील कल्याण केंद्रांना मदत होईल. 602 जिल्ह्यात क्रिटिकल केअर हॉस्पिटल सुरू केली जातील. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राला बळकटी दिली जाईल.
 • सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळांना जोडण्यासाठी एकात्मिक आरोग्य माहिती पोर्टल सुरू केले जाईल. 15 आरोग्य आपत्कालीन ऑपरेशन सेंटर सुरू केले जातील. 9 बायो सेफ्टी लेव्हल 3 लॅब सुरू होतील.

शेतकरी : APMCच्या अंतर्गत अ‍ॅग्री इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल

 • 2021-22 मध्ये कृषी पत लक्ष्य 16.5 लाख कोटी आहे. ऑपरेशन ग्रीन योजनेत 22 लवकर खराब होणाऱ्या पिकांचा समावेश केला जाईल.
 • कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) कृषी पायाभूत सुविधा निधीमध्येही प्रवेश असेल. कोची, चेन्नई, विशाखापट्टणम, पारादीप आणि पेटुआघाट यासारख्या शहरांमध्ये मोठे फिशिंग हार्बर बांधले जातील. तामिळनाडूमध्ये बहुउद्देशीय सी-विड पार्क बांधले जाणार आहे.