आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Budget 2021 : Budget Session Of Parliament Will Commence On January 29 Union Budget Will Be On February 1

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट 1 फेब्रुवारीलाच:अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार, सरकार लादू शकते कोविड सरचार्ज

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
यावेळी अर्थसंकल्प अभूतपूर्व होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. -फाइल फोटो - Divya Marathi
यावेळी अर्थसंकल्प अभूतपूर्व होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. -फाइल फोटो
  • 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार असून, 1 फेब्रुवारीला बजेट सादर केले जाणार आहे. सत्राचे दोन भाग असतील. पहिला भाग 29 जानेवारी ते 15 फेब्रुवारी आणि दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत होईल. संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने (सीसीपीए) या तारखांची शिफारस केली आहे. यावर मंत्रिमंडळ अंतिम निर्णय घेणार आहे.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. अधिवेशनाच्या दुसर्‍या भागात अर्थसंकल्पाच्या प्रस्तावांवर चर्चा होईल. यापूर्वी सरकारने कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन बोलावले नव्हते. CCPA ने म्हटले की, अधिवेशन काळात कोरोना विषाणूशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल.

यावेळी अर्थसंकल्प अभूतपूर्व होईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते. सरकारकडील पैशांची कमतरता लक्षात घेता, या अर्थसंकल्पात कोविड सरचार्ज लागू शकतो असे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...