आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Budget 2021 Government Should Give Rs 10,000 Crore To Energy Department In Budget: Chandrasekhar Bavankule

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज केंद्रीय अर्थसंकल्प:सरकारने बजेटमध्ये ऊर्जा खात्याला 10 हजार कोटी द्यावे : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारमण सोमवारी कोरोनातील पहिले बजेट सादर करतील. त्यांचे भाषण सोमवारी सकाळी ११ वाजता सुरू होईल.

सरकारने बजेटमध्ये ऊर्जा खात्याला १० हजार कोटी द्यावे : माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे
महाविकास आघाडीचे सरकार मुघलांसारखे वागत आहे. राज्यातील ७८ लाख वीज ग्राहकांना वीज कापण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या. राज्याच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नाही, असे सांगतानाच आघाडी सरकारने वीज बिल माफीसाठी अर्थसंकल्पात ऊर्जा खात्याला १० हजार कोटींचे अनुदान द्यावे, अशी मागणी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे केली. या शिवाय ४० हजार कोटी इतर सोयी सुविधा उभारणीसाठी द्यावे. याचा फायदा महावितरणच्या सर्वसामान्य ग्राहकांसोबतच आर्थिक दुर्बल घटकांनाही होईल, असे बावनकुळे म्हणाले.कोरोना काळात आमचे सरकार आले, तर वीज बिल माफी करा, असे मी मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगेन, असे बावनकुळे म्हणाले. साडेसात शेतकऱ्यांना आमच्या काळात वीज जोडणी दिली. हे सरकार का कचरत आहे, असा सवाल बावनकुळेंनी केला.

सरकारच्या वीज कापण्याच्या आदेशामुळे गरिबांच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली आहे. ग्राहकांना आत्महत्येकडे नेण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली. आमच्या सरकारच्या काळात ४५ लाख ग्राहकांकडे थकीत वीज बिले असतानाही आम्ही तगादा लावला नाही. सरकारने वीज बिल वसुलीसाठी १० टक्क्यांवर कमिशन एजंट नेमले आहे. हे सरकार सावकार झाले आहे. सरकारने नोटीस मागे घ्यावा. भाजप वीज कापू देणार नाही, असा इशारा बावनकुळेंनी दिला.

मनगटात ताकद नाही; मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
यात खरा दोष मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्र्यांना सांगून निर्णय घेतला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय न घेणे चुकीचे आहे. त्यांच्या मनगटात ताकद नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी माझी मागणी आहे. ५६ हजार कोटी थकीत ठेवूनही वीज कंपन्या आमच्या काळात प्रॉफिटमध्ये होत्या, याकडे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...