आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आर्थिक सर्वेक्षण:पुढील वर्षी देशाचा विकास दर विक्रमी 11 टक्क्यांवर जाणार, सरकारने जारी केले अर्थव्यवस्थेबाबतचे आपले अंदाज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोग्यावर जीडीपीच्या 3% खर्च करण्याची शिफारस, कृषी क्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ

यंदाच्या वर्षी देशाच्या जीडीपीत ७.७ टक्क्यांची घसरण होईल. मात्र पुढील वर्षी आर्थिक वृद्धिदर ११ टक्क्यांच्या पातळीवर पोहाेचेल. ही आजवरची उच्चांकी पातळी असेल. शुक्रवारी संसदेत सादर वित्त वर्ष २०२०-२१ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात सरकारने हे अंदाज व्यक्त केले आहेत. कृषी क्षेत्रात वाढ सुरू आहे. लॉकडाऊनमुळे सेवा, मॅन्युफॅक्चरिंग व निर्मिती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. महामारीमुळे २०२०-२१ वर्षातील अंदािजत ७.७% संकुचनामुळे भारताचे प्रत्यक्ष राष्ट्रीय उत्पादन २०२१-२२ मध्ये ११.०% व सध्याच्या बाजार मूल्याने जीडीपी १५.४% दराने वाढण्याचा अंदाज आहे.

आरोग्यावर जीडीपीच्या ३% खर्च करण्याची शिफारस

या अहवालात आरोग्यावर सरकारी खर्च सध्याच्या जीडीपीच्या एका टक्क्यावरून २.५ ते ३% करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामुळे लोकांचा आरोग्यावरील खर्च सध्याच्या ६५ टक्क्यांवरून ३५% होईल.

कृषी क्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ

केंद्राच्या आर्थिक सर्व्हे अहवालानुसार, कृषी या एकमेव क्षेत्रात सकारात्मक वृद्धी झाली. कृषीचा विकास दर यंदा ३.४% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रांत ९.६% व ८.८% घटीचा अंदाज आहे.