आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2021 बजेटमुळे बाजार तर आनंदी आहे, मात्र लोकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. दैनिक भास्करच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. भास्करच्या सर्व्हेत 70% लोकांनी बजट महागाई वाढवणारे असल्याचे म्हटले आहे. तर हे बजेट वाईट असल्याचे 58% लोकांनी म्हटले आहे. या सर्व्हेक्षणात भाजपचे सरकार असलेल्या मध्यप्रदेश, गुजरात आणि बिहारच्या लोकांचा देखील समावेश आहे.
सोमवारी संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे बजेट भाषण संपल्यानंतर लगेच भास्करने देशभरात ऑनलाइन आणि ऑफलाइन सर्व्हे केला. यामध्ये लोकांनी दोन प्रश्न विचारण्यात आहे. पहिला - तुम्ही या बजेटवर समाधानी आहात का? दुसरा - या बजेटमुळे महागाईचा फटका बसणार का?
ऑनलाइन सर्व्हेसाठी गूगल फॉर्म आणि सोशल मीडियाची मदत घेण्यात आली. तर महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, हरियाणा, दिल्ली, गुजरात, पंजाब, चंडीगड, झारखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये ऑफलाइन सर्व्हे करण्यात आला. कराबाबत काही नवीन नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीही सतत वाढत आहेत. वाढत्या महागाईचा त्यांच्या जेवणावरही परिणाम होणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.