आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Budget 2021 Reactions : Why Not Increase Defense Budget For Soldiers? Rahul Gandhi Questions PM Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया:जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवले नाही? राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात, मग...: राहुल गांधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत तर सत्ताधारी हा अर्थसंकल्प कसा उपयुक्त आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत जोरदार हल्ला चढवला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीवरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल केला आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केला आणि आपल्या सैनिकांना शहीद केले. पंतप्रधान फोटो ऑपसाठी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मग त्यांनी जवानांसाठी संरक्षण बजेट का वाढवले नाही? असा सवाल राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरून केला आहे.

संरक्षणमंत्र्यांनी मानले पंतप्रधान, अर्थमंत्र्यांचे आभार

केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी 4 लाख 78 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...