आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Budget 2022 | 01 Feb 2022 India Budget | Finance Minister Nirmala Sitaraman Budget 2022 Modi Govt | One Lakh Crore Announcement For States In The Budget; The Amount Paid Will Be Non interest Bearing For 50 Years

बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले?:सर्व राज्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी 1 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा; डिजिटलायझेशनवर असणार भर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाचे (2022-23) चे अर्थसंकल्प सादर केले आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशभरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अर्थसंकल्पात सर्वसामान्य करदात्यांच्या पदरी निराशा पडली आहे. तर कॉर्पोरेट टॅक्स कमी करत आणि त्याच्यावरील सरचार्ज कमी करून मोठा दिलासा दिला.

यामध्ये निर्मला सीतारमण यांच्या भाषणातून महाराष्ट्रासाठी विशेष घोषणा करण्यात आली नाही. महाराष्ट्रच नव्हे तर निवडणुका होऊ घातलेल्या पाच राज्यांनाही काही विशेष तरतूद केलेली नाही.

मात्र, 2022-23 साठी सर्व राज्यांना मदत करण्यासाठी 1 लाख कोटींची तरतूद आहे. एक लाख कोटी ही रक्कम राज्यांच्या एकूण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी दिली जाणार आहे. हा निधी पुढील 50 वर्षांसाठी असेल यावर कुठलेही व्याज आकारले जाणार नाही.

नदीजोड प्रकल्पासंदर्भात अर्थमंत्र्यांनी महत्वाची घोषणा केली. अर्थसंकल्पात त्यांनी सिंचन-पिण्याचे पाणी वाढवण्यावर भर दिला आहे. जलसंपदा विकास मंत्रालयाच्या मदतीने देशातील 5 मोठ्या नद्या जोडण्याचे कामही केले जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पार-तापी- नर्मदा, गोदावरी-कृष्णा आणि दमनगंगा-पिंजल या प्रकल्पांना जोडले जाणार आहे. ज्याचा फायदा महाराष्ट्राला होणार आहे.

डिजिटलायझेशनवर स्पष्ट भर

मार्चपासून सुरू होणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात तुम्हाला खरेदीसाठी पर्समध्ये कागदी नोटा घेऊन बाजारात जाण्याची गरज भासणार नाही. सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षात आपले डिजिटल चलन म्हणजेच डिजिटल रुपया लाँच करण्याची घोषणा केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी अर्थसंकल्पीय भाषणात ही माहिती दिली.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) डिजिटल चलन सुरू करण्यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. हे डिजिटल चलन जगभरात कार्यरत असलेल्या बिटकॉइन आणि इतर प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीप्रमाणे ब्लॉकचेन आणि इतर क्रिप्टो तंत्रज्ञानावर आधारित असेल.

देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल
अर्थमंत्री सीतारमण म्हणाल्या की, डिजिटल चलन सुरू झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनलाही गती मिळेल.

बातम्या आणखी आहेत...