आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Budget 2022 | Education Budget Big Announcement For Education Jobs Sector In Union Budget 2022 23 Skill Development | Marathi News

बजेट 2022:अर्थसंकल्पात डिजिटल विद्यापीठ आणि 60 लाख नव्या नोकऱ्या देण्याचे अर्थमंत्र्यांचे आश्वासन, शिक्षण आणि रोजगार क्षेत्राला आणखी काय मिळाले? जाणून घ्या...

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यंदाचे (2022-23) अर्थसंकल्प सादर करत आहेत. निर्मला सीतारमण यांनी शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सीतारमण यांनी बजेटमध्ये 60 लाख नवीन नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

 • आत्मनिर्भर भारत योजनेतर्गत 16 लाख नोकऱ्या देण्यात येणार आहेत.
 • त्याचबरोबर मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या देण्यात येतील.
 • रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम नव्याने सुरू केले जातील.
 • राष्ट्रीय कौशल्य पात्रता कार्यक्रम उद्योगांच्या गरजेनुसार तयार केला जाईल.
 • आवश्यकतेनुसार राज्य चालवल्या जाणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांनाही अपग्रेड केले जाईल.
 • देशाच्या विविध भागांतील शाळकरी मुलांचे शालेय शिक्षणाची दोन वर्षे साथीच्या रोगामुळे वाया गेली आहेत.
 • DTH प्लॅटफॉर्मवर प्रधानमंत्री ई-विद्या योजनेंतर्गत एक चॅनल एक वर्ग योजना 12 वरून 200 टीव्ही चॅनल योजना वाढवली जाईल.
 • इयत्ता पहिली ते बारावीच्या मुलांना त्यांच्या प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सुविधा दिली जाईल.
 • डिजिटल साधनांचा वापर अधिक चांगल्या प्रकारे करता यावा यासाठी डिजिटल विद्यापीठाची स्थापना केली जाईल.
 • टीव्ही, इंटरनेट, रेडिओ आणि इतर डिजिटल माध्यमांद्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये दर्जेदार अध्यापन साहित्य उपलब्ध करून दिले जाईल, जेणेकरून शिक्षकांना ई-सामग्री मिळू शकेल.
 • शहरांमध्ये रोजगाराच्या संधी वाढविण्याचे काम केले जाईल.
 • पाच सर्वोच्च शैक्षणिक संस्थांना सेंटर ऑफ एक्सलन्सचा दर्जा दिला जाईल.
 • त्यांना 25 हजार कोटींचा विशेष निधी दिला जाणार आहे.
 • AICTE या संस्थांसाठी प्राध्यापक आणि प्रशिक्षण कार्यक्रमांवर देखरेख करेल.
बातम्या आणखी आहेत...