आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Budget 2022 Education | Education Sector And Student Expects From Nirmala Sitharaman Budget | Marathi News

मी विद्यार्थी, मला काय मिळाले:डिजिटल युनिव्हर्सिटी तयार होणार, 1 क्लास-1 टीव्ही चॅनेलने शिकणार विद्यार्थी

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

कोरोनामुळे शाळा-कॉलेज बंद पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. UNESCO च्या अहवालानुसार, कोरोनामुळे शाळा सुटल्याचा सर्वाधिक प्रभाव 9 ते 12 व्या विद्यार्थ्यांवर पडला आहे. भारतात या वयोगटात सुमारे 13 कोटी विद्यार्थी आहेत. ज्यांना आपल्या भविष्याची आता चिंता लागली आहे. या विद्यार्थ्यांना आता चांगल्या शिक्षणासह नोकरी देखील पाहिजे आहे.

यासर्व गोष्टीवर विचार करत आजच्या बजेटमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी एक पाऊल उचलण्यात आले आहे. पंतप्रधान ई-विद्या योजने अंतर्गत चॅनेलवर आता या विद्यार्थ्यांसाठी वर्ग भरवले जाणार आहे. त्यासाठी सरकार 200 ई-विद्या चॅनेलची निर्मीती करणार आहेत. त्यामुळे पहिली ते 12 पर्यंतचे सर्व विद्यार्थी आता ऑनलाईन शिक्षण घेऊ शकणार आहेत. यासोबतच मुलांना प्रादेशिक भाषेत शिक्षणाची सुविधा देखील दिली जाणार आहे.

डिजिटल यूनिवर्सिटीची घोषणा

कोरोनामुळे शिक्षणावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडला आहे. त्यामुळे त्यासाठी सरकारने बजेटमध्ये डिजिटल यूनिवर्सिटीची घोषणा केली आहे. ज्यात वेगवेगळ्या भाषेत विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. देशातील टॉप यूनिवर्सिटीला देखील या कार्यक्रमात जोडले जाईल. असे सीतारमण म्हणाल्या.

अंगणवाडी होणार मॉडर्न
आजच्या अर्थसंकल्पात देशातील अंगणवाडी बाबत देखील मोठी घोषणा झाली आहे. देशभरातील सुमारे दोन लाख अंगणवाड्यांना आता मॉडर्न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच आता जुन्या अंगणवाडीला अपग्रेड केल्या जाईल.

या अर्थसंकल्पात रोजगारासंबधी या झाल्या घोषणा

 • आत्मनिर्भर भारत अंतर्गत 16 लाख नोकऱ्या देण्यात येणार आहेत.
 • मेक इन इंडिया अंतर्गत 60 लाख नोकऱ्या.
 • रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम नव्याने सुरू केले जातील.
 • राष्ट्रीय कौशल्य पात्रता कार्यक्रम उद्योगांच्या गरजेनुसार तयार केला जाईल.
 • आवश्यकतेनुसार राज्य चालवल्या जाणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण केंद्रांनाही अपग्रेड केले जाईल.

बेरोजगारी बद्दल सत्य

केंद्र सरकारने दावा केला आहे की, देशात बेरोजगारीचे चित्र बदलले आहे. देशातील बेरोजगारीचा दर पूर्वीपेक्षा आता कमी झाला आहे. असा दावा सरकारने केला आहे. मात्र सत्य जरा वेगळेच आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण बेरोजगार कशाला म्हणतात ते पाहूया. बेरोजगार ते असतात, जे नोकरीसाठी बाहेर बाजारात निघतात. मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची नोकरी मिळत नाही.

इंग्रजीत याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन असे म्हटले जाते. याचा अर्थ असा की तुम्ही काम करण्यास सक्षम आहात मात्र तुम्ही नोकरी मागण्यास जात नाहीत. तर तुमची गणना बेरोजगारांमध्ये होणार नाही. सत्य हे आहे की नोकरी शोधणाऱ्यांची संख्या कमी असल्याने बेरोजगारीचे प्रमाण कमी असल्याचे दिसते. प्रश्न पडतो की, लोकांकडे नोकरीसाठी सर्व कौशल्य असून देखील ते नोकरी का मागत नाहीत. याचे उत्तर आहे की, विद्यार्थी आणि तरुण हतबल झाले आहेत. त्यांनी आशा गमावली आहे. कारण त्यांना चांगले शिक्षण आणि नोकरी देखील भेटत नाही.

पदवीधरांची संख्या वाढत आहे

 • सन 2000 मध्ये भारतात सुमारे 86 लाख विद्यार्थी पदवीधर झाले आहेत.
 • सन 2016 मध्ये 86 लाख विद्यार्थींनी पदवी परिक्षा देत डिग्री प्राप्त केली.
 • 4 कोटी विद्यार्थी पदवी घेत दरवर्षी नोकरीच्या शोधात बाहेर पडतात.

12 वी पास झालेले विद्यार्थी

 • सन 2000 साली 99 लाख विद्यार्थी बारावी परिक्षेत पास झाले होते.
 • सन 2016 मध्ये बारावी पास होणाऱ्यांची संख्या सुमारे अडीच कोटी होती.
 • दरवर्षी तीन कोटी विद्यार्थी बारावी परिक्षा उत्तीर्ण होऊन नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी जात असतात.
बातम्या आणखी आहेत...