आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी 5 मोठ्या घोषणा केल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नवीन कर प्रणाली फायदेशीर आहे की जुनी? तुमचा पगार वार्षिक 10 लाखांपर्यंत असेल व तुम्ही गुंतवणूक करण्यास तयार असाल, तर जुनी कर प्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कसे, ते जाणून घेऊया....
जुन्या कर प्रणालीतील कर गणना नंतर कळेल. प्रथम अर्थसंकल्पात जारी करण्यात आलेल्या नवीन कर प्रणालीशी संबंधित घोषणा व किती कर भरावा लागेल याची माहिती घेऊया...
अर्थमंत्र्यांनी 7 लाखांच्या उत्पन्नावर संपूर्ण कर सवलत दिली आहे. टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आला आहे. 50 हजारांच्या स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश करण्यात आला आहे. उच्च उत्पन्न गटातील हायर सरचार्ज रेट कमी करण्यात आला आहे. तर सेवानिवृत्तीनंतर प्राप्त झालेल्या रजा रोख रकमेवरील कर मर्यादा वाढवण्यात आली आहे. संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
आता समजून घेऊया नवीन कर प्रणालीमध्ये तुमच्या पगारावर किती कर आकारला जाईल?
7.50 लाखांपर्यंतचे वेतन टॅक्स फ्री कशी होईल?
CA कार्तिक गुप्ता यांच्या मते, नवीन कर प्रणालीमध्ये 50,000 रुपयांच्या मानक वजावटीचाही (स्टँडर्ड डिडक्शन) समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या पगारावर कोणताही कर लागणार नाही. हे असे समजून घ्या...7.5 लाख रुपयांच्या पगारातून प्रथम 50,000 रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन वजा करा. उरले 7 लाख रुपये. आता तुम्ही सवलतीच्या कक्षेत याल. तुम्हाला संपूर्ण कर सूट मिळेल.
तुमचा पगार 10, 15 किंवा 20 लाख रुपये असेल, तर तुम्हाला फक्त 50,000 रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळेल. स्टँडर्ड डिडक्शनचा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला किती कर भरावा लागेल ते ग्राफिक्समध्ये पाहा...
ही गोष्ट झाली नव्या करप्रणालीची... आता जाणून घेऊया जुन्या करप्रणालीत तुम्हाला किती कर भरावा लागेल...
जुन्या कर ऑप्शनमध्येही 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करता येते
यंदाच्या अर्थसंकल्पात जुन्या कर प्रणाली अंतर्गत प्राप्तिकरात सवलत देण्यात आली नाही. वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तर आयकर भरावा लागेल. तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख ते 10 लाखांदरम्यान असेल, तर तुम्हाला 20% पर्यंत कर द्यावा लागेल. आयकर कायद्यात अशा अनेक तरतुदी आहेत, ज्यातून तुम्ही स्वतःचे उत्पन्न करमुक्त करू शकता. त्याचे संपूर्ण गणित समजून घ्या...
आता समजून घ्या कसा वाचेल कर?
आयकर कलम 87A चा फायदा घेऊन 10 लाखांच्या उत्पन्नातून 5 लाख रुपये वजा करा. त्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये होईल. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये, 50,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. ही रक्कम 5 लाख रुपयांमधून वजा केल्यास करपात्र उत्पन्न 4.5 लाख रुपये होईल.
80C अंतर्गत तुम्ही 1.5 लाखांपर्यंत कर वाचवू शकता. यासाठी ईपीएफ, पीपीएफ, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, म्युच्युअल फंड, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, 5 वर्षाची एफडी, नॅशनल पेन्शन सिस्टीम व सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक करावी लागेल. यापैकी कोणत्याही एका किंवा अनेक योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक 1.5 लाखांपर्यंतची गुंतवणूक करावी लागेल. तुम्ही हे केले असेल, तर 4.5 लाख रुपयांतून आणखी 1.50 लाख रुपये वजा करा. आता कराच्या कक्षेत येणारे उत्पन्न 3 लाख रुपये राहील.
तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर आयकर कलम 24B अंतर्गत तुम्हाला 2 लाखांच्या व्याजावर कर सूट मिळते. हे तुमच्या करपात्र उत्पन्नातून देखील वजा करा. म्हणजे आता तुमचे केवळ 1 लाख रुपयांचे उत्पन्न कराच्या कक्षेत येईल.
तुम्ही नॅशनल पेन्शन सिस्टममध्ये (NPS) वार्षिक 50,000 रुपयांपर्यंत स्वतंत्रपणे गुंतवणूक केल्यास, कलम 80CCD (1B) अंतर्गत तुम्हाला 50,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
80D अंतर्गत वैद्यकीय पॉलिसी घेतल्यास, तुम्ही 25,000 रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. या आरोग्य विम्यात तुमची, तुमची पत्नी व मुलांची नावे असावीत. याशिवाय, जर तुमचे पालक ज्येष्ठ नागरिक असतील, तर तुम्ही त्यांच्या नावानेही आरोग्य विमा खरेदी करून 50,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळवू शकता. अशा प्रकारे, तुम्ही 10 लाख रुपयांच्या उत्पन्नावर संपूर्ण कर वाचवू शकता.
टीप: कर गणना अंदाजे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.