आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी करदात्यांना दिलासा दिला, पण त्यांना.... जे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये नव्या कर प्रणालीची निवड करतील. जुन्या कर प्रणालीद्वारे कर भरणा करणाऱ्या करदात्यांना पूर्वीसारखाच कर द्यावा लागेल.
नवी कर प्रणाली निवडणाऱ्यांना रिबेटची मर्यादा 7 लाख रुपये करण्यात आली आहे. पूर्वी ही 5 लाख रुपये होती. अर्थसंकल्पात नोकरदारांना आणखी एक दिलासा देण्यात आला आहे. नव्या कर प्रणालीत 50 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शनचाही समावेश करण्यात आला आहे. म्हणजे 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक वेतनावर कोणताही कर लागणार नाही. हे असे समजून घ्या... 7.5 लाख रुपयांच्या सॅलरीवरील प्रथम 50 हजार रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन कापून घ्या. उरले 7 लाख रुपये. 7 लाख रुपये उरताच तुम्ही रिबेटच्या कक्षेत याल. अशा पद्धतीने तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.
पण तुमचे उत्पन्न सॅलरीतून मिळणारे नसेल, तर स्टँडर्ड डिडक्शनचा तुम्हाला फायदा मिळणार नाही. म्हणजे तुमचे उत्पन्न 7 लाख रुपयांपेक्षा एक रुपयाही जास्त असेल, तर तुम्हाला कर द्यावाच लागेल.
अर्थमंत्र्यांनी नव्या कर प्रणालीत नव्या स्लॅबचीही घोषणा केली आहे. त्यांच्यासाठी आता 3 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. तुम्हाला तुमचा टॅक्स कॅल्क्युलेट करून दाखवण्यापूर्वी नव्या स्लॅबचे ग्राफिक्स पाहा...
आता समजून घेऊया की, तुम्हाला वेतन मिळत नाही आणि तुमचे उत्पन्न वार्षिक 7.5 लाख रुपयांपर्यंतचे असेल, तर तुम्हाला किती टॅक्स द्यावा लागेल... खालील ग्राफिक्समध्ये पाहा...
(CA कार्तिक गुप्ता व CA प्रतिष्ठा गुप्ता यांच्यानुसार करगणना)
आता जाणून घ्या जर तुम्हाला पगार मिळत नसेल आणि तुमचे वार्षिक उत्पन्न 10 लाख रुपये असेल आणि तुम्ही नवीन कर प्रणाली निवडली असेल, तर किती कर भरावा लागेल…
जुन्या कर प्रणालींतर्गत 2.5 लाखांहून जास्त उत्पन्नावर कर
जुन्या कर प्रणाली अंतर्गत 2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल. म्हणजे तुमचे उत्पन्न 2.5 ते 5 लाख रुपयांपर्यंतचे असेल, तर तुम्हाला 5 लाख - 2.5 लाख = 2.5 लाख रुपयांवर 5% कर द्यावा लागेल. पण प्राप्तिकर कायद्याच्या कलम 87A चा लाभ घेऊन, तुम्हाला आणखी 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कर वाचवता येईल.
सरकार 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% दराने आयकर आकारते. पण आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत हा कर माफ देखील करते. याचा अर्थ असा की, जर एखाद्याचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल, तर त्याला कोणताही आयकर भरावा लागत नाही. पण तुमचे उत्पन्न 5 लाख 10 हजार रुपये असेल, तर 10 हजार रुपयांवर कर भरण्याऐवजी, तुम्हाला 5.10 लाख - 2.5 लाख. = 2.60 लाखांवर कर भरावा लागेल.
सध्या इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी 2 पर्याय
आयकर रिटर्न अर्थात आयटीआर भरण्याचे सध्या 2 पर्याय उपलब्ध आहेत. नवीन पर्याय 1 एप्रिल 2020 रोजी देण्यात आला. सरकारने नवीन कर प्रणालीला डीफॉल्ट पर्याय बनवले आहे. म्हणजे अर्थसंकल्पात प्राप्तिकरात दिलेली सवलत यावरच लागू होईल. तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडली, तर तुम्हाला ही सवलत मिळणार नाही. तुम्ही जुनी कर व्यवस्था निवडल्यास, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचे सर्व कागदपत्रे द्यावी लागतील व जुन्या कर स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
आता वाचा इन्कम टॅक्सबद्दल काही रंजक माहिती…
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.