आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंसदेचे यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 31 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधी या सत्रावर कोरोनाचा धोका कायम आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पुर्वीच संसदेतील 700 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चार जानेवारीपर्यंत सुमारे 718 कर्मचाऱ्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
ज्यामध्ये 204 कर्मचारी हे राज्यसभा सचिवालयाचे आहे. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याव्यतिरिक्त आढळलेले कोरोना रुग्ण देखील संसदीय कामकाजाशी निगडीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोरोनाची भिती व्यक्त केली जात आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनाप्रमाणे असेल काही निर्बंध
देशात ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. असे असताना संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारीपासून सुरू होत आहे. मात्र हे अधिवेशन देखील गेल्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनाप्रमाणे असू शकते. सप्टेंबर 2020 मध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनात कोरोनाचे निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यावेळी पहिल्या सत्रात राज्यसभेचे कामकाज तर दुसऱ्या सत्रात लोकसभेचे कामकाजाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यानंतर मात्र बजेट सत्र, पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन हे ठरलेल्या वेळेनुसारच पार पडले. मात्र या काळात कोरोना आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करण्यात आले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशातील सत्रादरम्यान देखील कोरोना प्रोटोकॉल लागु होण्याची दाट शक्यता आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाची झाली घोषणा
देशात कोरोनाचा धोका वाढत चालला असून, यादरम्यान लोकसभा सचिवालयाने शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा केली आहे. लोकसभेचे आठवे सत्र हे 31 जानेवारीपासून सुरू होणार असून आठ एप्रिलला हे अधिवेशन संपण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 31 जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. तर केंद्रीय अर्थसंकल्प हा 1 फेब्रुवारी रोजी मांडले जाणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.