आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान खरगे म्हणाले की, २०१४ च्या निवडणुकीत भाजपने दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे काय झालेॽ त्या आश्वासनानुसार आतापर्यंत १५ कोटी नोकऱ्या द्यावयाच्या होत्या.
परंतु तुम्ही किती नोकऱ्या दिल्याॽ आता पुढील पाच वर्षांत ६० लाख नोकऱ्यांचे आश्वासन देत आहात. केंद्र सरकारमध्ये नऊ लाख पदे रिक्त आहेत. रेल्वेत १५ टक्के, संरक्षण क्षेत्रात १२ टक्के पद रिक्त आहेत. ती भरली का जात नाहीतॽ शहरी क्षेत्रात बेरोजगारी दर ९ टक्के आणि ग्रामीण भागात ७.२ टक्के झाला आहे.
यापूर्वी धन्यवाद प्रस्ताव सादर करताना भाजपच्या गीता ऊर्फ चंद्रप्रभा म्हणाल्या की, मोदी सरकारने महिला, ओबीसी, एससी-एसटीसह सर्वच वर्गांच्या कल्याणासाठी काम केले. स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवल्याबद्दल विरोधकांवर संतापलेल्या चंद्रप्रभा म्हणाल्या की, शौचालयांची निर्मिती केल्याने देशात पाच लाख मृत्यू टाळले जाऊ शकतात.
पंजाबमधील भाजपचे खासदार श्वेत मलिक म्हणाले की, केंद्र सरकारच्या दहशतवाद सहन न करण्याच्या धोरणामुळे शेजारी देशाच्या सीमेवरील दु:साहस मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. सपा खासदार रामगोपाल यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात निवडणुकीनंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यास राम मंदिर गतीने आणखी चांगले उभारले जाईल.
मोदी म्हणाले, बजेटमध्ये अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्यावर भर
पंतप्रधान मोदींनी आज बजेट आणि आत्मनिर्भर भारत विषयावर भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी अर्थसंकल्पावर सविस्तर बोलत त्याचे लाभ सांगताना म्हटले की, हा अर्थसंकल्प देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाईल. गेल्या सात वर्षांत जे निर्णय घेतले गेले, जे धोरण आखले त्यामुळे अर्थव्यवस्थेचा सातत्याने विस्तार होत आहे. सात वर्षांपूर्वी जीडीपी एक लाख दहा हजार कोटी, आज भारताचा जीडीपी २ लाख ३० हजारांच्या जवळपास आहे. सन २०१३-१४ मध्ये भारताची निर्यात २ लाख ८५ हजार कोटी रुपयांची होत होती.
आता भारताची निर्यात ४ लाख ७० हजार कोटींच्या जवळ पोहोचली आहे. अन्नदात्याला ऊर्जादाता बनवण्यावर सरकारचा भर आहे. त्यामुळे शेतीत सोलार पॅनल लावण्याचे काम केले जात आहे. सोलार पंपद्वारे शेतकऱ्यांना मदत मिळेल. रसायनमुक्त शेतीवर सरकारचा जोर आहे. आम्ही मागील सत्रात एमएसपीवर विक्री-खरेदी केली. यात शेतकऱ्यांना दीड लाख कोटींवर मिळाल्याचा अंदाज आहे. दोन लाख कोटींपेक्षा जात एमएसपी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वळती केली जाईल. बजेटमध्ये पीएम शेतकरी सन्मान निधीअंतर्गत ६८ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
भाजपच्या गीता ऊर्फ चंद्रप्रभा म्हणाल्या की, मोदी सरकारने महिला, ओबीसी, एससी-एसटीसह सर्वच वर्गांच्या कल्याणासाठी काम केले. स्वच्छता अभियानाची खिल्ली उडवल्याबद्दल विरोधकांवर संतापलेल्या चंद्रप्रभा म्हणाल्या की, शौचालयांची निर्मिती केल्याने देशात पाच लाख मृत्यू टाळले जाऊ शकतात.
पंजाबमधील भाजपचे खासदार श्वेत मलिक म्हणाले की, केंद्र सरकारच्या दहशतवाद सहन न करण्याच्या धोरणामुळे शेजारी देशाच्या सीमेवरील दु:साहस मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. सपा खासदार रामगोपाल यादव म्हणाले की, उत्तर प्रदेशात निवडणुकीनंतर अखिलेश यादव मुख्यमंत्री झाल्यास राम मंदिर गतीने आणखी चांगले उभारले जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.